घरठाणेAmbani security scare : मनसुख हिरेन हत्येचा उलगडा, ATS चा मोठा दावा,...

Ambani security scare : मनसुख हिरेन हत्येचा उलगडा, ATS चा मोठा दावा, ठाण्यातून २ जण अटकेत

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची विनायक शिंदे आणि नरेश दारे अशी नावे आहेत. मनसुख हिरेन प्रकरणात या दोघांचाही सहभाग आढळून आला आहे. तर याच प्रकरणाशी संबंधित दोन पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी होत आहे. या प्रकरणात काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन प्रकरणात आणखी काही नव्या बाबी उघडकीस येतील अशीही माहिती आहे. शनिवारपासूनच ठाण्यात एटीएसकडून तपासाला वेग आला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्राची यंत्रणा असलेल्या नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीकडे गेल्याची माहिती समोर आली. आज रविवारी झालेली अटक ही दहशतवाद विरोधी पथकाकडून झाली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा आता एटीएसकडून करण्यात येत आहे. (Ambani security scare, ATS arrested two suspected from thane in mansukh hiren murder case)

अटक झालेल्या व्यक्ती कोण आहेत ?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात रविवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. एकाचे नाव विनायक शिंदे आहे. तर दुसरी व्यक्ती नरेश दारे या नावाची आहे. मनसुख हिरेन प्रकरणात या दोघा व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आला आहे. विनायक शिंदे बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल आहे. लखनभैया बोगस चकमक प्रकरणात विनायक शिंदेला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. लखनभय्या प्रकरणात विनायक शिंदेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो पॅरोलवर बाहेर आला होता. तर दुसरी अटक झालेली व्यक्ती ही क्रिकेट बुकी आहे. या दोन्ही व्यक्ती ठाण्यात राहणाऱ्या आहेत. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)कडून या दोघांनाही रविवारी अटक करण्यात आली. मनसुख हिरेन प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा आता एटीएसकडून करण्यात येत आहे. मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात दोघांचाही सहभाग आढळल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -