Apple Truck accident : ठाण्यात काश्मिरी सफरचंदचा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत

ट्रक मध्ये तब्बल १७ टन सफरचंद होते.

Apple Truck accident apple traffic due to truck collapse in thane manpada ghodbunder road
Apple Truck accident : ठाण्यात काश्मिरी सफरचंदचा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत

काश्मीरहून ठाण्याच्या दिशेनं येणारा ट्रक घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे काश्मिरी सफरचंदाचा ट्रक उलटून मोठा अपघात झाला. या अपघातामुळे ठाण्यता प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. १७ टन सफरचंद घेऊन ठाण्यातील मानपाडा उड्डाणपुलाजवळ उलटला सुदैवाने कोणालाही अपघातामध्ये दुखापत झाली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून ट्रकचे नुकसान झालं आहे. रस्त्यावर दिव्यांच्या प्रकाशामुळे उड्डाणपुलाच्या कडेला असलेल्या दुभाजकावर ट्रक गेला यामुळे ट्रक उलटून अपघात झाला. ठाणे वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करुन वाहतूक पुर्ववत केली आहे.

काश्मीर येथून ठाणे मार्गे वाशीच्या एफएमसी मार्केटला १७ टन सफरचंद घेऊन निघालेला ट्रक घोडबंदर रोडवरील मानपाडा उड्डाण पुलाजवळ पहाटेच्या उलटला. सुदैवाने या घटनेत कोणाला ही दुखापत झाली नसली तरी, या घोडबंदर वरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक सकाळच्या सुमारास धीम्या गतीने सुरू होती. उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

नितीन श्रीवास्तव यांच्या मालकीच्या ट्रक मध्ये काश्मीर येथील सफरचंद घेऊन चालक राजकुमार हा ठाण्यातील घोडबंदर रोड मार्गे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वाशीच्या एफएमसी मार्केटला निघाला होता. ट्रक मानपाडा उड्डाण पुलाजवळ येथे येताच चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या एका बाजूला उलटला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली. ट्रक मध्ये तब्बल १७ टन सफरचंद होते. तसेच ट्रक मधील ऑईलही रस्त्यावर सांडले. या घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभागासह चितळसर-मानपाडा पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळच्या सुमारास एक हायड्रा क्रेनला पाचारण केले. त्यानंतर तो उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटल्याने घोडबंदर रोडवरील वाहतूक उड्डाणपूल आणि सेवा रस्ता मार्गे धीम्या गतीने सुरू होते. तसेच रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती पसरविण्यात आल्यावर वाहतूक सुरु करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.


हेही वाचा :  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीचे वातावरण, प्रवाशांच्या फ्लाईट्स चुकल्या