दिव्यातील तलावात कार बुडाली; चालक स्थानिकांच्या तत्परतेने बचावला

रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने फडकेपाडा तलावामध्ये मारुती सुझुकी सेलरो कार दिवा,खर्डीगाव, येथील फडकेपाडा तलावामध्ये बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत, कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही.

रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने फडकेपाडा तलावामध्ये मारुती सुझुकी सेलरो कार दिवा,खर्डीगाव, येथील फडकेपाडा तलावामध्ये बुडाल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत, कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. तर मुंबई चेंबुर येथील कारचालक युसुफ पठाण याला तेथील दक्ष व स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढून जीवनदान दिले. (Car sinks in Divya lake The driver was rescued by locals)

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन केंद्राचे जवान १-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यावर तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनांमधील चालक युसुफ पठाण (२८) याला तेथील स्थानिक नागरिकांनी सुरक्षितपणे तलावाच्या बाहेर काढले व वाहनांमध्ये इतर कोणीही व्यक्ती नसल्याची माहिती स्वतः वाहन चालकाने दिली.

त्यानंतर शीळ पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तलावामध्ये बुडालेल्या चारचाकी वाहनाला सोमवारी रात्रीच रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढून वाहन चालकाच्या ताब्यात दिले.

रस्त्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने तलावामध्ये गेल्याची माहिती चालकाने दिली. ही कार मे. रजा एंटरप्राइजेस नामक कंपनीच्या मालकीची असल्याचे चालकाने सांगितले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने (Rainfall) जोरदार बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाकडून मुंबईसाठी (Mumbai) पुढील २ दिवस सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – भाजपचे ‘मिशन १३४’चे टार्गेट ; शिवसेनेच्या जागा रडारवर