घरCORONA UPDATEPune Corona Update: दिवसभरात १,७५१ नवे रूग्ण; ८८३ जणांना डिस्चार्ज

Pune Corona Update: दिवसभरात १,७५१ नवे रूग्ण; ८८३ जणांना डिस्चार्ज

Subscribe

कोरोनामुळे तब्बल ३३ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार ५७६ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तसेच मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात ८३३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण २५ हजार १२९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तर दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १ हजार ६८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर सध्या पुणे शहरात १६ हजार २६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख पॉझिटिव्ह; १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

यासह पुण्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे १ हजार ७५१ नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४२ हजार ४६६ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे तब्बल ३३ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुणे शहरात आज ७ हजार ५९५ करोना चाचण्या करण्यात आल्या असल्याने आतापर्यंत एकूण २ लाख २३ हजार ३९ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण ४२ हजार ४६६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत, तर १६ हजार २६९ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -