घरCORONA UPDATECorona Live Update: भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगाटला कोरोनाची लागण

Corona Live Update: भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगाटला कोरोनाची लागण

Subscribe

आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगाटला कोरोनाची लागण झाली आहे.


आज राज्यात २४ तासात १४,३६१ नवे रूग्णांची नोंद झाली आहे. तर ३३१ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ११,६०७ रुग्णबरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५,४३,१७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -

जनता दलचे नेते आणि आमदार एचडी रेवन्ना यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती कर्नाटक वैद्यकीय आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे निधन

नाशिकरोड  येथील माजी नगरसेवक प्रकाश दामोदर बोराडे (५७) यांचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले, बोराडे यांच्या निधनाने नाशिकरोड, जेलरोड भागात शोककळा पसरली आहे. पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे, आठ दिवसांपुर्वी त्यांना त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. (सविस्तर वाचा)


एसएसबीच्या ग्वाल्दम कॅम्पमधील सशस्त्र सीमा बलाचे ५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती उत्तराखंडमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी चमोली जीएस राणा यांनी दिली. 


Intas pharma करतेय देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपीची लस

देशात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज हजारो कोरोना रूग्णांची नोंद केली जात आहे. त्याचबरोबर जगातील कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लस शोधण्यात येत आहे. दरम्यान, इंटस फार्मा देशातील पहिल्या प्लाझ्मा थेरपी लससाठी एका महिन्यात मानवी चाचणी सुरू करणार आहे. सध्या जगात कोरोना विषाणूवर कोणतेही अचूक औषध किंवा लस नाही. यासाठी अनेक देश कोरोना विषाणूच्या लसीवर काम करत आहेत. बरेच देश कोरोना लस बनवत आहेत, असा दावाही करत आहेत. त्याच वेळी, कोरोना व्हायरसवरील उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपी देखील खूप प्रभावी मानली जात आहे. (सविस्तर वाचा)


भारतात आतापर्यंत २५ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत ७७ हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३३ लाख ८७ हजार वर पोहचला आहे. दरम्यान, भारतात ३३ लाख ८७ हजार ५०१ कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या ७ लाख ४२ हजार २३ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


देशभरात कोरोनाच्या आकड्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील आकडे चितांजनक पद्धतीने वाढत आहेत. आज राज्यात १४,७१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,३३,५६८ झाली आहे. राज्यात आज एकूण १,७८,२३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. झाली असून, मृतांची संख्या २३ हंजार ४४४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -