Corona Live Update: राज्यात आज २१२७ कोरोना रुग्णांची नोंद

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

राज्यात २१२७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ७६ जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २१२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर एकूण ७६ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३७ हजार १३६च्या घरात गेली आहे. तर मृतांचा आकडा १३२५पर्यंत गेला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट हळूहळू राज्यावर गहिरं होत चाललेलं दिसून येत आहे. या सगळ्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकूण १२०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या रुग्णांमुळे डिस्चार्ज मिळून घरी गेलेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ६३९वर गेला आहे. (सविस्तर वाचा)


चाकरमान्यांचा हिरमोड

मुंबई, पुणे ठाणे येथील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन अर्जभरत गावी जाण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता चाकरमान्यांचे हे प्रयत्न असफल ठरले असून काही चाकरमान्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर जिल्ह्याने मान्यता न दिल्याने परवानगी नकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याचमुळे आता जिल्हा प्रशासना विरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई तसेच नवी मुंबई येथून काही चाकरमान्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालये पुन्हा सुरू

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी कार्यालय पुन्हा एकदा सुरू झाले. कोरोना व्हायरसच्या परिणामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प झालेले हे महत्वाचे, असे कार्यालय पुन्हा एकदा सुरू झाले आहे. राज्य सरकारला मुख्यत्वेकरून महसूल मिळवून देणाऱ्या खात्यापैकी एक असे हे कार्यालय आहे. पण, आज ही कार्यालये मुंबईत पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. मुंबईत आजपासून एकूण १० हॉस्पिटल्स पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. कंटेन्टमेंट झोन वगळता इतर ठिकाणची कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, कंटेन्टमेंट झोनमधील ऑफिसेस यापुढेही बंद राहणार आहेत. आज पहिल्याच दिवशी एकूण ४८७ दस्तावेजांची नोंदणी या कार्यालयात करण्यात आली. त्यापैकी ४८१ दस्तावेज हे लिव्ह एण्ड लायसन्सच्या नोंदणीसाठी होते. तर तीन दस्तावेज हे कन्वेयन्स सेल्ससाठीचे होते. उर्वरीत दस्तावेज हे टायटल डीडच्या नोंदणीचे होते. मुंबईत दहा सुरू झालेल्या कार्यालय़ांमध्ये मुंबई शहरातील २ कार्यालये, अंधेरी, बोरिवली, कुर्ला यासारख्या ऑफिसेसचा समावेश आहे. एकुण ४८७ दस्तावेजांच्या नोंदणीतून एकूण २३ लाख ७४ हजार रूपयांचा महसूल राज्य सरकारला जमा झाला आहे.


कल्याण डोंबिवलीत ३७ नवे रुग्ण 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मंगळवारी ३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधिताचा आकडा ५६८ झाला आहे. आज डोंबिवली पूर्वेतील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संखया १२ झाली आहे. करोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याणमध्ये १३ रुग्ण, डोंबिवलीत १९ , आंबिवली येथे २ रुग्ण तर टिटवाळात ३ कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत ५६८ रुग्णांपैकी २१४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

बेस्टचे ९ कर्मचारी कोरोनाग्रस्त, कोरोनाबाधितांचा आकडा १३७ वर    

कोरोना विरुद्धच्या लढाईतील बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. बेस्टमधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची  संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. मंगळवारी  बेस्टमध्ये ९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेस्टमधील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल १३७ वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, मंत्रालय, महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने- आण करण्यासाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे. परंतु अत्यावश्यक सेवा देणारे सेवेकरी जास्त आणि बसेसची संख्या कमी यामुळे बसमध्ये सोशल डिस्टिसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. बेस्टमध्ये मंगळवारी ९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. बेस्टमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे एकुण ८ कर्मचाऱ्यांचा  मृत्यू झाला आहे. तर ६३  जणांनी कोरोनावर मात केली आहे.


३९ हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ३८.७३ टक्के

देशात गेल्या २४ तासांत एकूण २,३५० कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३९,१७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. भारताचा रूग्ण बरे होण्याचा दर ३८.७३ टक्के आहे. रूग्ण बरे होण्याचा दर निरंतर सुधारत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतातील रूग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षा २० पट चांगला आहे. (सविस्तर वाचा)


मालेगावात पूर्णतः लॉकडाऊन

राज्यातील इतर शहरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात असताना कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मालेगाव शहरात व ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी निर्गमीत केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी घरात थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (सविस्त वाचा)


२४ तासांत ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा

कोरोना विषाणूने राज्यात आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र पोलिसांना देखील आता कोरोनाची बाधा होत आहे. राज्यात २४ तासांत तब्बल ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजार ३२८ वर गेला आहे. त्यात १३६ अधिकाऱ्यांचा समावेश असून आतापर्यंत कोरोनामुळे १२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ३२४ पोलीस पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


कोरोना योद्ध्यांना ऑनलाईन प्रशिक्षण; जम्बो सुविधा केंद्राला देण्यासाठी प्रशासनाची तयारी

मुंबईमध्ये वरळी नेहरू तारांगण, रेस कोर्स, बीकेसी-एमएमआरडीए, नेस्को आणि सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या जम्बो सुविधा केंद्रांवर नियुक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (सविस्तर वाचा)


वांद्रे स्थानकाबाहेर पुन्हा स्थलांतरित मजुरांची गर्दी पाहायला मिळाली. बिहारला जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेसाठी या तुफान गर्दी आज सकाळी झाली होती. जवळपास हजारोपेक्षा जास्त स्थलांतरित मजूर होते. पण तुफान गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले.


राज्यात गेल्या २४ तासांत ५५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण १ हजार ३२८ पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत.


कोरोना विषाणुचा फटका सर्वाधिक अमेरिकेला बसला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १५ लाख ५० हजार २९४ झाला आहे. तर ३ लाख ५६ हजार ३८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


लॉकडाऊन दरम्यान अडकलेले मजूर सध्या आपापल्या गावी परतत आहेत. पण याचदरम्यान अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे. सोलापूरहून झारखंडला जाणाऱ्या मजुरांच्या एसटी बसने टिप्परला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार मजुरांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. यामधील एका मजुरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.


देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखपार झाला आहे. त्यापैकी ३ हजार १५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आता पर्यंत ३९ हजार २३३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारहून अधिक आहे.

देशातील सविस्तर आकडेवारी

महाराष्ट्र – ३५,०५८ कोरोनाबाधित – १२४९ मृत्यू
तमिळनाडू – ११,७६० कोरोनाबाधित – ८२ मृत्यू
गुजरात – ११,७४६ कोरोनाबाधित – ६९४ मृत्यू
दिल्ली – १०,०५४ कोरोनाबाधित – १६० मृत्यू
राजस्थान – ५,५०७ कोरोनाबाधित – १३८ मृत्यू
मध्य प्रदेश – ५,२३६ कोरोनाबाधित -२५२ मृत्यू
उत्तर प्रदेश – ४,६०५ कोरोनाबाधित – ११८ मृत्यू
पश्चिम बंगाल – २,८२५ कोरोनाबाधित – २४४ मृत्यू
पंजाब – १,९८० कोरोनाबाधित – ३७ मृत्यू
तेलंगणा – १,५९२ कोरोनाबाधित – ३४ मृत्यू
बिहार – १,४२३ कोरोनाबाधित – ९ मृत्यू
जम्मू काश्मिर – १,२८९ कोरोनाबाधित – १५ मृत्यू
कर्नाटक – १,२४६ कोरोनाबाधित – ३७ मृत्यू
हरयाणा – ९२८ कोरोनाबाधित – १४ मृत्यू
ओडिसा – ८७६ कोरोनाबाधित – ४ मृत्यू
केरळ – ६३१ कोरोनाबाधित – ४ मृत्यू
झारखंड – २२८ कोरोनाबाधित – ३ मृत्यू
चंदीगढ – १९६ कोरोनाबाधित – ३ मृत्यू
त्रिपुरा – १६५ कोरोनाबाधित – ० मृत्यू
आसाम – ११६ कोरोनाबाधित – ४ मृत्यू
उत्तराखंड – ९६ कोरोनाबाधित – १ मृत्यू
छत्तीसगड – ९५ कोरोनाबाधित – ० मृत्यू
हिमाचल प्रदेश – ९० कोरोनाबाधित – ३ मृत्यू
लडाख – ४३ कोरोनाबाधित – ० मृत्यू
गोवा – ३८ कोरोनाबाधित – ० मृत्यू
अंदमान आणि निकोबार – ३३ कोरोनाबाधित
पाँड्युचरी – १७ कोरोनाबाधित – ० मृत्यू
मेघालय – १३ कोरोनाबाधित – १ मृत्यू
मणिपुर – ७ कोरोनाबाधित – ० मृत्यू
मिझोरमा – १ कोरोनाबाधित – ० मृत्यू
अरुणाचल प्रदेश – १ कोरोनाबाधित – ० मृत्यू
दादरा अंद नगर हवेली – १ कोरोनाबाधित  – ० मृत्यू
एकूण – १,००,३२८ कोरोनाबाधित – ३,१५६ मृत्यू


राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तर ५१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२४९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७४९ रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ८४३७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसाला दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सलग दोन दिवस राज्यात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने सरकारच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.