घरक्राइम'सलमान त्रास देतो' आई वडिलांची बदनामी रोखण्यासाठी नाजिशची आत्महत्या

‘सलमान त्रास देतो’ आई वडिलांची बदनामी रोखण्यासाठी नाजिशची आत्महत्या

Subscribe

राजधानी दिल्ली येथील भजनपुरा परिसरात एका विद्यार्थींने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आत्महत्या पूर्वी एक सुसाइट नोट लिहिलेली सापडली आहे. लोनी (गाजियाबाद) येथील एका व्यक्तीला तिने आत्महत्येस कारणीभूत असल्याचे सुसाइट नोटमध्ये सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक विद्यार्थी २३ वर्षीय असून तिचे नाव नाजिश असे आहे. ती आईपी युनिव्हर्सिटीच्या बी.एडच्या द्वितीय वर्षात शिक्षत होती. दरम्यान एक व्यक्ती तिच्यामागे सतत पाठलाग करत होता. तिचा मानसिक छळ करत होता. या गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केली. मंगळवारी तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.

- Advertisement -

वास्तविक, ही घटना १२ ऑक्टोबरची आहे. नाजिश नावाच्या विद्यार्थींनीने भजनपुरा येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यावेळेस कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली तेव्हा मुलीच्या खोलीत सुसाइड नोट सापडली.

नाजिशने सुसाइट नोटमध्ये काय लिहिले आहे वाचा 

- Advertisement -

नाजिशच्या सुसाइट नोटमधून लोनीचा रहिवाशी सलमानला मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. ज्याच्यामुळे नाजिशने आत्महत्या केली. पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले की, ‘९ ऑगस्टला आरोपी हाजी सलमान नाजिशचा पाठलाग करत घरी आला आणि त्याने धमकावले. पण त्यावेळेस लोकांची त्याला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. तेव्हापासून मुलगी अस्वस्थ झाली होती.’

आता पोलीस नाजिशच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. याप्रकरणी भजनपुरा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपी हाजी सलमान आणि नाजिश हे फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना संपर्कात आले होते. सध्या पोलीस या अँगलने तपास करत आहेत.’


हेही वाचा – न्यूड फोटो पाठवणाऱ्याला महिलेनं असा काही रिप्लाय दिला, तो सुतासारखा सरळ झाला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -