घरAssembly Battle 2022UP Election 2022 : यूपीमध्ये निवडणूकांच्या प्रचारामुळे वाढली फुलांची मागणी

UP Election 2022 : यूपीमध्ये निवडणूकांच्या प्रचारामुळे वाढली फुलांची मागणी

Subscribe

आम्ही फार आनंदी आहोत कारण लग्नाचा आणि निवडणूकांचा मोसम एकत्र आला. प्रत्येक राजकीय पक्षांनी आमच्याकडून फूले विकत घेतली. निवडणूकांच्या या काळात सध्या झेंडूच्या फुलांना फार मागणी आहे. २०-२५ रुपये किलोंनी आम्ही झेंडूची फुले विकत आहोत.

UP Election 2022 :  उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसरा टप्पा १४ फेब्रुवारी रोजी आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅलींची संख्या वाढली आहे. याचा सर्वाधिक फायदा हा तिथल्या फूल विक्रेत्यांना झाला आहे. निवडणूकांच्या प्रचाराच्या काळात फूलांना प्रचंड मागणी असल्याचे तिथले विक्रेते सांगतात.

एका विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, यूपीमध्ये विधानसभा निवडणूकांच्या प्रचारावेळी फूलांची मागणी प्रचंड वाढली. त्याचप्रमाणे याच काळात लग्नांचा मोसम असल्याने आमचा धंदा जोरदार सुरू होता. तिथले विक्रेते निवडणूकांमुळे खूश असल्याचे दिसून आले आहे. एका विक्रेत्याने म्हटलेय, आम्ही फार आनंदी आहोत कारण लग्नाचा आणि निवडणूकांचा मोसम एकत्र आला. प्रत्येक राजकीय पक्षांनी आमच्याकडून फूले विकत घेतली. निवडणूकांच्या या काळात सध्या झेंडूच्या फुलांना फार मागणी आहे. २०-२५ रुपये किलोंनी आम्ही झेंडूची फुले विकत आहोत.

- Advertisement -

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांच्या टप्प्यात ११ जिल्ह्यांसाठी ५८ जागांसाठी ६०.१७ टक्के मतदान झाले. कोरोना प्रोटोकॉल्सनुसार, एका तासाच्या वाढीव मुदतीनंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. काही ठिकाणी ईवीएस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्या मात्र मतदान शांततापूर्वक पार पडले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात शामली, हापुडा, गौतम बुद्ध नगर, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाजियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, मथुका आणि आग्रा जिल्ह्यात मतदान पार पडले. या टप्प्यात राज्य सरकारचे श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण यांच्यासह एकूण ६२३ उमेदवारांसाठी मतदान पार पडले. यात ७३ महिलांचा समावेश होता.


हेही वाचा – UP Election 2022 : यूपीत पहिल्या टप्प्यासाठी ६०.१७ टक्के मतदान, शांततेत पार…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -