Amit Thackeray in Raigad: अमित ठाकरेंच्या हस्ते अलिबाग गड संपर्क कार्यालयाचे उदघाटन, मनसैनिकांमध्ये नवं चैतन्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे व आमदार राजू दादा पाटील यांच्या हस्ते पेण रायगड येथील मनसे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उदघाटन केले. युवा नेते अमित ठाकरे यांच्या झंजावती रायगड दौऱ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मन सैनिकामध्ये प्रचंड जोश व नवं चैतन्य संचारले असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

अमित ठाकरे हे पेण व अलिबाग मध्ये येत असल्याने ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात मनसैनिक गुंतले होते. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अमित ठाकरे यांचा रायगडातील दौरा ही मनसे च्या निवडणुकीची तयारीची नांदी मानली जातेय.यावेळी रुपेश पाटील म्हणाले.

कीसन्माननीय युवा हृदयसम्राट अमित साहेब ठाकरे आणि कल्याण डोंबिवलीचे आमदार राजूदादा पाटील यांच्या हस्ते आमच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून येणाऱ्या काळात युवकांचे पक्षामध्ये प्रवेश, जिल्हा परिषद, पेण नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये मनसे देखील रिंगणात ताकतीने उतरणार आहोत. पेण नगरपालिकेवर मनसे झेंडा फडकावणार असा दमदार विश्वास रुपेश पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे कार्यालय नसून ते जनसेवेचे न्यायालय असणार आहे. असे रुपेश पाटील म्हणाले.

रुपेश पाटील म्हणाले की, युवा नेते अमितजी ठाकरे व आमदार राजू दादा पाटील यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले ही बाब तमाम मनसैनिकांसाठी अत्यंत आनंदाची आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न व समस्यां सोडविणार असून भविष्यात पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्यावर अधिकाधिक भर देणार आहोत.

येत्या नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत मनसे आपला करिष्मा दाखवून देईल असा विश्वास रुपेश पाटील यांनी व्यक्त केला. अमित ठाकरे यांनी पनवेल, उरण, पेण, अलिबाग असा दौरा केला. युवा नेते अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांचे पेण, अलिबाग यथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला रायगड जिल्हाध्यक्ष सौ.सपनाताई पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष महेश पोरे,पेण मनसे अध्यक्ष रुपेश पाटील आदी उपस्थित होते.


हेही वाचा : Hijab Controversy: हिजाब वाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर, मँचेस्टर युनायटेडच्या फ्रेंच फुटबॉलरकडून पोस्ट शेअर