घरताज्या घडामोडीकॉलेजला जाणारी माझ्या गावातील मी पहिली मुलगी होते, शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू...

कॉलेजला जाणारी माझ्या गावातील मी पहिली मुलगी होते, शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू भावूक

Subscribe

भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आज सकाळी संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामना यांनी त्यांना शपथ दिली. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली होती. त्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी होऊन द्रौपदी मुर्मू विजयी ठरल्या. त्याप्रमाणे त्यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी सर्वांचे आभार मानले

शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काय म्हणाल्या?

- Advertisement -

भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल सर्व खासदार आणि आमदारांचे मी आभार मानते. राष्ट्रपती पदासाठी मला अशा काळात निवडून दिलंय ज्या वर्षी आपला भारत स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करत आहे. आजपासून काहीच दिवसांत आपला भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण करेल.

आपला भारत देश स्वातंत्र्याची ५० वर्षे साजरे करत होता तेव्हा मी माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. आणि आज ७५ व्या वर्षी मला नवा पदभार मिळाला आहे. मी देशातील पहिली अशी राष्ट्रपती आहे जी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आले आहे.

- Advertisement -

आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी आपल्याकडे ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या अपेक्षा अमृतमहोत्सव काळात पूर्ण करण्यासाठी गतीशील करायच्या आहेत. यापुढे सबका प्रयास आणि सबका कर्तव्य या दोन रुळांवरून आपल्याला पुढे जायचं आहे. उद्या, २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस भारतीय सेनेच्या शौर्य आणि संयमाचे प्रतिक आहे.

मी माझी जीनवयात्रा ओडिसातील एका छोट्या गावातून सुरू केली होती. मी ज्या भागातून येते तिथे शिक्षण घेणंसुद्धा कठीण मानलं जातं. मात्र, अनेक संकटांनंतरही माझा संकल्प दृढ राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी बनली.

मी आदिवासी समाजातून आहे. तरीही मी वॉर्ड कॉन्सिलरपासून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकले. भारतातील लोकशाहीची ही महानता आहे. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी, आदिवासी समाजातील मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचते ही भारतातील लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रपती पदासाठी माझी निवड झाल्याने हे स्पष्ट होतंय की भारतातील लोक स्वप्नही पाहू शकतात आणि ती पूर्णही करू शकतात.

उमेदवारी जाहीर होताच विजय निश्चित होता

२४ जुलै रोजी रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार होता. त्यामुळे १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. २१ जुलै रोजी मतमोजणी झाली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू विजयी ठरल्या. युपीएने त्यांना उमेदवारी जाहीर करताच त्यांचा विजय निश्चित झाला होता. मात्र, निवडणुकीच्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या. त्यांना ७१.२९ टक्के मते मिळाली आहेत. एकूण १०,५८,९८० मूल्यांच्या ४७०१ वैध मतांपैकी त्यांना ६,७६,८०३ मूल्याची २८२४ मते मिळाली. महाराष्ट्रातून त्यांना ३१,६७५ मूल्यांची मते मिळाली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -