Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पत्नीला तिच्या रंगावरून सतत हिणवणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

पत्नीला तिच्या रंगावरून सतत हिणवणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

एकीकडे राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळात गुन्हांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अजूनही वर्णभेद केला जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान लातूरमध्ये पत्नीला तिच्या रंगावरून सतत हिणवणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे.

नक्की काय घडले?

माहितीनुसार, या पीडित महिलेचे नाव प्रतिक्षा संतोष याचावाड असे आहे. तिचे डॉ.संतोष गंगाधर याचावाड याच्यासोबत २६ डिसेंबर २०१८ रोजी लग्न झाले होते. पण तिचा पती सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत मारहाण होता आणि तिला उपाशी ठेवत होता. तसेच तिला सतत तू काळी आहेस, नोकरी करायची नाही, माहेरवरुन प्लॉट घेण्यासाठी ३० लाख रुपये घेऊन ये अन्यथा नांदवणार नाही, असे सांगून मारहाण करुन २१ मे रोजी घरातून हाकलून दिले होते. यापूर्वी तिच्या वडिलांनी दवाखान्याच्या विकासकामासाठी ७ लाख ५१ हजार रुपये पतीला दिलेले होते. तरी तो तिचा छळ करत होता. यामध्ये सासू सुरेखा गंगाधर याचावाड, सासरे गंगाधर गोविंद याचावाड व नणंद सुचिता प्रशांत इंद्राळे यांचा देखील हात होता. त्यामूळे आता याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -