घरताज्या घडामोडीहाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महिला अत्याचारावर तातडीने आढावा बैठक

हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महिला अत्याचारावर तातडीने आढावा बैठक

Subscribe

हाथरस पीडितेवरील अत्याचाराच्या घटनेची दखल घेत महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली आहे. या घटनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या महिलांवरील अत्याचारांचा आढावा यानिमित्त घेतला जाईल, अशी माहिती गृहखात्याच्या एका अधिकार्‍याने या प्रतिनिधीला दिली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणानंतर देशभर संतापाची एकच लाट उसळली. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याच्या बातम्या माध्यमांमधून बाहेर येऊ लागल्या होत्या.

- Advertisement -

या वृत्ताची दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ महिला अत्याचारांच्या घटनांचा आढावा घेण्याकरिता तात्काळ बैठक घेतली आहे. ही बैठक आज मंगळवारी दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये तिथे काम करणार्‍या महिला डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्यावर काही व्यक्तींनी अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.

या घटनांची पार्श्वभूमी आणि उत्तर प्रदेशमधील गंभीर घटना यांची दखल घेऊन ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महिलांवरील अत्याचारांचा आढावा घेतला जाईलच, शिवाय याप्रकरणी काय कारवाई केली? किती कारवाया झाल्या? आणि त्यांना कोणत्या शिक्षा झाल्या? याचीही माहिती बैठकीत घेतली जाणार आहे. या बैठकीला राज्यातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी, गृह खात्याचे अधिकारी तसेच मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित राहतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -