धक्कादायक! पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरुम, बाथरुम तसेच मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये छुपे कॅमेरे

आपल्या खोलीत काही तरी संशायस्पद असल्याचा संशय आल्यानंतर महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली

Hidden cameras in women doctor's bedroom, bathroom, mobile charger and LED bulb in Pune Bharati vidyapith
धक्कादायक! पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरुम, बाथरुम तसेच मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये छुपे कॅमेरे

पुण्याच्या भारती विद्यापिठातील कॅम्पसमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममधून छुपे कॅमेरे आढळून आलेत. (Hidden cameras in women doctor’s bedroom, bathroom, mobile charger and LED bulb in Pune Bharati vidyapith)  ही महिला भारती विद्यापिठाच्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या कॉर्टर्समध्ये राहत होती. आपल्या खोलीत काही तरी संशायस्पद असल्याचा संशय आल्यानंतर महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्या रुममध्ये छुपे कॅमेरे असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे पोलिसांनी संपूर्ण रुमची तपासणी केली असता त्यांना मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये देखील छुपे कॅमेरे असल्याचे आढळून आले. पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहात.

नेमकं काय घडल?

भारती विद्यापिठाच्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या या महिला डॉक्टर नेहमीप्रमाणे ६ जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास कामावर गेल्या. संध्याकाळी त्या पुन्हा रुममध्ये आल्यानंतर त्यांना त्यांच्या रुममध्ये काही तरी संशयास्पद वाटले म्हणून त्यांनी संपूर्ण रुम चेक केला. तेव्हा त्यांना रुमच्या एका कोपऱ्यात लाल लाईट चमकतान दिसली. त्यांच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये अशाप्रकारची लाईट चमकत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्वरीत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या संपूर्ण रुमची पुन्हा एकदा पहाणी केली असता त्यांना रुममधील मोबाईल चार्जर आणि led ब्लबमध्ये देखील छुपे कॅमेरे असल्याचे निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर महिलेला मोठा धक्का बसला.

डॉक्टर महिलेच्या रुममध्ये अशाप्रकारचे छुपे कॅमेरे आले कुठून? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. महिलेच्या रुमला लॉक असताना कॅमेरे लावण्यासाठी आरोपी रुममध्ये गेला कसा? अशाप्रकारचे छुपे कॅमेरे लावून महिलांच्या खासगी आयुष्याचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणार मोठे रॅकेट काम करत आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा – सहा हजार शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा