घरठाणे...तर रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडीत होणार

…तर रुग्णांना होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडीत होणार

Subscribe

वाहनांमुळे प्राणवायूच्या पाईपलाईनला धोका

कोविड सेंटर असलेल्या रुग्णालयांना बाहेरून ऑक्सिजनचे सिलिंडर आणून ते कोविड रुग्णांना पुरवावे लागले. या घटनेतून बोध घेत कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) प्रशासनाने कल्याण येथील रुक्मिणीबाई रुणालयात नुकताच ऑक्सिजन प्लांट आणि यंत्रणा बसवली आहे. यामुळे यापुढे रुग्णालयातील रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवता येणार आहे. ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन पुरविणारी तांब्याची पाईप लाईन रुग्णालयापर्यंत जमिनीवरून नेताना सिमेंटने झाकण्यात आले आहे. मात्र तेथून रुग्णालयाची वाहने वळवताना हे सिमेंट निघून पाईपलाईन निघाल्यास ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोविडच्या काळात रुग्णांना ऑक्सिजन पुरविताना सरकारी यंत्रणांना फार मोठी कसरत करावी लागली. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा अल्प प्रमाणात असल्याने अनेक रुग्णांच्या जीवावर ओढवले होते. ही बाब लक्षात घेता कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी करीत तेथे नुतनीकरण व वैद्यकीय सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लगेच रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूतिगृह वसंत व्हॅली येथे हलविण्यात आले. त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आला.

- Advertisement -

ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन पुरविणारी तांब्याची पाईप लाईन रुग्णालयापर्यंत जमिनीवरून नेण्यात आली आहे. ती जमिनीवरून नेताना त्यावर सिमेंटचा थर टाकून जमिनीवर घट्ट बसविण्यात आली. मात्र रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयाची वाहनांची वर्दळ असते. रुग्णालयाच्या मागील भागात वाहने वळवताना हा सिमेंटचा थर ढिला होऊन ऑक्सिजन पुरविणाऱ्या पाईप लाईन निखळून त्यावेळी ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांच्या जीव धोक्यात सापडू शकतो. अशा प्रकारे पाईप लाईन टाकण्याचे काम  महापालिकेच्या कोणत्या अभियंत्याच्या सांगण्यावरून करण्यात आले, असा प्रश्न यानिमित्ताने उत्पन्न झाला आहे.

 गरजू रुग्णांना त्वरेने ऑक्सिजन

नव्याने बसविण्यात आलेल्या या प्लांटमधून आवश्यकता असलेल्या ऑपरेशन थिएटर, अपघात विभाग इत्यादीमध्ये ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. त्यामुळे या कोणत्याही विभागात असलेल्या गरजू रुग्णांना त्वरेने ऑक्सिजन पुरविण्याचा मार्ग सुकर झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी आपलं महानगरशी बोलताना

- Advertisement -

हेही वाचा –Maratha Reservation: राज्याला आरक्षण मर्यादेत वाढ गरजेची- अशोक चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -