Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट Live Update: उद्या एकनाथ खडसे ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार?

Live Update: उद्या एकनाथ खडसे ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार?

Related Story

- Advertisement -

भोसरी MIDV भूखंडप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची उद्या ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे समोर येत आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मकर संक्रांतीनिमित्ताने पंतग महोत्सवात सहभाग घेतला.

- Advertisement -


शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या ठिकाणी बैठक सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बालात्काराच्या आरोपावर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय शरद पवार आणि पक्ष विचार करून घेतील अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.


राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटिल, प्रफुल्ल पटेल हे बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत धनंजय मुंडे प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू मुंडे चौकशासाठी हजर झाल्या आहेत. मुंबईच्या डिएन नगर पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.


धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. येत्या २-३ दिवसात मुंबई पोलीस धनंजय मुंडे आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर या प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.


नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरी NCB ने छापेमारी केली आहे. समीर खान यांचे तस्कर सजनानीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. काल समीर खान यांच्या अटक केली. आज त्यांच्या वांद्रातील घरी NCBने छापेमारी केली आहे.


अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

- Advertisement -