घरताज्या घडामोडीLive Update: पाच राज्यांच्या निवडणूक वादविवादातून काँग्रेसचा प्रवक्त्यांना मागे घेण्याचा निर्णय

Live Update: पाच राज्यांच्या निवडणूक वादविवादातून काँग्रेसचा प्रवक्त्यांना मागे घेण्याचा निर्णय

Subscribe

निवडणूक वादविवादातून आमच्या प्रवक्त्यांना मागे घेण्याचा निर्णय असल्याचे काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी जाहीर केले आहे. यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेस प्रवक्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वादविवाद करणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई पाहायाल मिळाली होती परंतु २ मे रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच २ मे रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पंढपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेद्वार भगीरथ भालके यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे. तर मतमोजणी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून अवघ्या काही तासांनी निवडणूकीच्या निकालाची सत्यता बाहेर येणार आहे. भाजप उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचारासाठी भाजपने चांगलाच जोर लावला होता. परंतु आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे. #Pandharpur By Election Result 2021 (Pandharpur By Election Result 2021)


२१ एप्रिल ते ९ मे या कालावधीसाठी ८ लाखांहून अधिक रेमडेसिवीरच्या कुप्यांचा पुरवठा

- Advertisement -

(सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा)


राज्यात ६३ हजार २८२ नवे कोरोनाबाधित


मुंबईत गेल्या २४ तासात ३९०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५९०० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा


नागपूरमध्ये कोरोनाचा हैदोस २४ तासात ६ हजार ५७६ कोरोनाबाधितांची नोंद, तर ९९ कोरोना रुग्णांचा मृत्यू


दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये १ आठवड्याची वाढ, मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल यांची घोषणा


रशियाकडून आलेल्या स्पुतनिक व्हीच्या पहिल्या लसी हैदराबादमध्ये दाखल आल्या आहेत. १ मे पासून ही लस भारताला मिळणार होती. रशियाची स्फुटनिक लसील परवानगी देणारा भारत हा ६०वा देश ठरला आहे.


कल्याण रेल्वे गोदामाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गोड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


आजपासून देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मुंबईतही काही निवडक केंद्रावर १८ वर्षांवरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. नायर,बीकेसी,कूपर,सेव्हन हिल्स, राजावाडी या लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.


देशात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काही राज्यांमध्ये लसीकरण सुरु झाले असून काही राज्यांनी लसीच्या तुटवड्याचे कारण देत लसीकरण सुरु केलेले नाही.पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिसा, तमिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, जम्मू काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात लसीकरण सुरु झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -