घरताज्या घडामोडी२ कोटी रुपये किंमतीच्या मांडूळ सापाची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात!  

२ कोटी रुपये किंमतीच्या मांडूळ सापाची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात!  

Subscribe

२ कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या आरोपीला खारघर पोलिसांनी आज दुपारी खारघर येथे सापळा रचून अटक केली. हस्तगत करण्यात आलेल्या सदर सपाची लांबी १५२ सेमी असून वजन ५ किलो २४० ग्राम इतके आहे. पोलीस खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडूळ सापामुळे धनदौलत आणि ऐश्वर्य प्राप्त होते असे आमिष लोकांना दाखवून किशोर गोविंद पाटील ही व्यक्ती लोकांना मोठ्या किंमतीत मांडूळ सापाची विक्री करून लोकांची फसवणूक करते. सदर व्यक्ती मांडूळ जातीचे दुतोंडी सर्प विक्री करण्यासाठी खारघर येथील द क्राऊन बिल्डिंग जवळ येणार आहे, अशी माहिती पोलीस खबरीकडून खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती.

पोलिसांनी असा रचला सापळा

सदर सापाची किंमत २५ कोटी रुपये सांगितली असल्याची माहिती खबरीने पोलिसांना दिली होती. त्यानुसार, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी तातडीने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात द क्राऊन बिल्डिंग परिसरात सापळा रचला. दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी एक ४० वर्षीय इसम खारघर सेक्टर १५ येथील द क्राउन बिल्डिंगच्या जवळ आला असता पोलीस खबरीने पोलिसांना हीच ती व्यक्ती असल्याचा इशारा केला. सदर व्यक्तीला पोलिसांचा अंदाज येताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील मांडूळ साप हस्तगत केला. सदर सापाची लांबी १५२ सेमी असून ५ किलो २४० ग्राम वजन आहे. त्याची बाजारभावाप्रमाणे २ कोटी रुपये किंमत आहे. द क्राऊन बिल्डिंग मधील ऑफिस क्रमांक १००४  मध्ये सदर मांडूळ साप विक्री करून मिळालेल्या रक्कमेतून सदर व्यक्ती हॉटेल व्यवसाय सुरू करणार होतो, अशी कबुली आरोपीने दिली. आरोपी हा भिवंडी तालुक्यातील दलोंडे या गावातील रहिवाशी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शहीद पोलीस जवानांच्या पाल्यांना महासंचालकांच्या हस्ते नियुक्तीपत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -