घरनवी मुंबईशहीद पोलीस जवानांच्या पाल्यांना महासंचालकांच्या हस्ते नियुक्तीपत्र

शहीद पोलीस जवानांच्या पाल्यांना महासंचालकांच्या हस्ते नियुक्तीपत्र

Subscribe

नवी मुंबई आणि कोकण परिक्षेत्रातील ८३ पोलिसांच्या वारसांना पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

कोरोना महामारीचा सामना करताना आपला जीव गमविलेल्या कोविड योद्धांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने कडक सॅल्युट ठोकण्यात आला आहे. नवी मुंबई आणि कोकण परिक्षेत्रातील ८३ पोलिसांच्या वारसांना पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये मंगळवारी पार पडलेल्या एका विशेष समारंभात राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते या वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस दलातील अनुकंपातत्वावर होणारी भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. मात्र कोरोना महामारीत ज्या पोलीस कर्मचा-यांनी आपले प्राण गमविले, त्यांच्या वारसांना तातडीने पोलीस सेवेत सामावून घ्या अशा सूचना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई आणि कोकण परिक्षेत्रातील पोलीस अधिकारींनी अनुकंपा तत्वावर भरती होणा-या ८३ पोलीस वारसांची यादी तयार करून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. या सर्व वारसांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, सहपोलीस आयुक्त बी. जी. शेखर पाटील, जय जाधव, पोलीस अधिक्षक अशोक दुधे, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले.

- Advertisement -

पोलिसांच्या कडक परीक्षेचा काळ
हा कार्यक्रम भावस्पर्शी आहे. एका बाजुला माणसे गमविल्याचे दुखः तर दुस-या बाजूला मोठा आघात झालेल्या या कुटूंबांना आधार देण्याचे समाधान. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासकीय पातळीवर विविध जीआर काढले जात होते. त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. त्यामुळे हा काळ पोलिसांसाठी कडक परिक्षेचा होता. अनुकंपावरील भरती तातडीने करण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न आहेत, असे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -