Mangaon : महाराष्ट्र बँकेचे माणगावातील ATM बंद ; अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे

नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मानगाव,एटीएम,महाराष्ट्र बँक,Mangaon : महाराष्ट्र बँकेचे माणगावातील ATM बंद ; अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे ,Mangaon: Maharashtra Bank ATMs closed in Mangaon
Mangaon : महाराष्ट्र बँकेचे माणगावातील ATM बंद ; अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे

बँक ऑफ महाराष्ट्राचे येथील एटीएम तब्बल दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, एटीएम पूर्ववत करण्याऐवजी संबंधित अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती, तसेच रहदारीच्या ठिकाणी कचेरी रोड कॉर्नरजवळ हे एटीएम आहे. गाजावाजा करून सुरू झालेले एटीएम दोन वर्षांपासून ‘आऊट ऑफ ऑर्डर’ असून, त्याकडे बँकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

मानगाव तालुक्यातील नागरिक कामानिमित्त येथे येत असतात. रोख पैसे बाळगण्यापेक्षा गरज लागेल तेव्हा एटीएममधून पैसे काढण्याकडे बहुतेकांचा कल वाढलेला असताना मोक्याच्या ठिकाणी असलेली ही एटीएम सेवा बंद असल्याने गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेली ही बँक एटीएम बंद असताना जागेचे भाडे देत असल्याने जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र बँकेची तालुक्यातील निजामपूरसह रोहे शहर आणि तालुक्यातील वरसगाव येथील एटीएमसुद्धा बंद आहेत. या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता ते उडवाउडवी करण्यात धन्यता मानत असल्याचे लक्षात येते.


हे ही वाचा – पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माचा पताका उंचवणारे महाद्वार ठरतील, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य