घरक्रीडाHockey : अत्यंत बिकट परिस्थितीतून केली होती सुरूवात; आता हॉकीच्या 'राणी' ला...

Hockey : अत्यंत बिकट परिस्थितीतून केली होती सुरूवात; आता हॉकीच्या ‘राणी’ ला मिळाला पद्मश्री

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक मधील महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे

टोकियो ऑलिम्पिक मधील महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. राणीच्या नेतृत्वात भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिकच्या हॉकी संघांच्या यादीत चौथ्या स्थानावर राहिला होता. आतापर्यंतच्या भारतीय महिला संघाच्या ऑलिम्पिकमधील इतिहासातील सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन म्हणून याची नोंद झाली आहे. राणी वयाच्या फक्त १५ व्या वर्षी भारतीय हॉकी संघात समाविष्ठ झाली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला कांस्य पदकाला मुकावे लागले होते. पण शेवटच्या काही सामन्यात ज्या प्रकारे भारतीय संघाने कामगिरी केली ती उल्लेखणीय होती. त्याच्यामुळे महिला हॉकी संघाने संपूर्ण देशातील नागरिकांची मने जिंकली आहेत.

ऑलिम्पिकमधील महत्त्वाच्या कामगिरीमागे संघाचे प्रशिक्षक तसेच सर्व खेळाडूंचे मोठे योगदान होते. तेवढाच महत्त्वाचा वाटा कर्णधार राणी रामपालचा होता. राणीने सलग होणाऱ्या पराभवातून संघाला सावरत संघाची एका उज्ज्वल यशाकडे वाटचाल केली. कर्णधार राणी रामपालच्या चांगल्या नेतृत्वाच्या बदल्यात भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या चौथ्या स्थानावर राहिला. हे महिला हॉकी संघाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होते. तर राणी रामपालला काही दिवसांपूर्वीच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

हॉकीच्या ‘राणी’ चा संघर्षमय प्रवास

हॉकीच्या राणीचा इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय झाला आहे. राणीच्या जीवनातील संघर्ष प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. अत्यंत गरीब कुटुंबात राणी रामपालचा जन्म झाला होता. राणीला लहानपणापासूनच हॉकीची आवड होती. तिचे वडील गाडी चालवायचे आणि घरातील उदरनिर्वाह करायचे. दिवसाला अवघे १०० रूपये कमवणाऱ्या वडीलांच्या राणीला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ही नक्कीच तिच्या वडीलांसाठी अभिमानाची बाब आहे. तिची आई घरकाम करून घरखर्च सांभाळायची. गळत्या घरात दिवस काढलेल्या राणीचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

राणीला वयाच्या ६ व्या वर्षांपासूनच हॉकीची आवड होती. राणीच्या घरासमोरच हॉकीचे प्रशिक्षण केंद्र होते. शाळेतून ये-जा करताना हॉकीचे मैदान राणीचे लक्ष वेधू लागले. तेव्हापासूनच राणीचा हॉकीच्या स्टीकसोबत प्रवास सुरू झाला. राणी वयाच्या १५ व्या वर्षापासूनच भारतीय हॉकी संघासोबत जोडली होती. २००९ मध्ये राणी ला ‘द यंगेस्ट प्लेयर’ म्हणून घोषित केले होते. २०१९ मध्ये राणीला ‘गेम अॅथेलीट ऑफ द ईयर’ चा किताब मिळाला होता. हे पहिल्यांदाच झाले होते की कोणत्या खेळाडूला हा पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

हे ही वाचा: Dronacharya Award : कुस्तीचा अवमान झाला, गुरूच्या समर्थनार्थ उतरला बजरंग पुनिया


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -