Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मनसेच्या जमील शेख हत्येसाठी NCP नगरसेवकाने २ लाख दिले, हल्लेखोराचा खळबळजनक आरोप

मनसेच्या जमील शेख हत्येसाठी NCP नगरसेवकाने २ लाख दिले, हल्लेखोराचा खळबळजनक आरोप

राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीमउल्ला याच्या कार्यालयाची तोडफोड, ठाण्यात तणाव शीघ्र कृती दलाचे पाचारण

Related Story

- Advertisement -
मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येसाठी आपल्याला दोन लाख रुपये मिळाले होते, व ही हत्या ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीमउल्ला यांच्या सांगण्यावरून करण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स ने अटक केलेल्या हल्लेखोराने केला आहे. या आरोपानंतर संतप्त झालेल्या जमील शेख यांच्या समर्थकांकडून नगरसेवक नजीमउल्ला यांच्या कार्यालयाची आणि त्याच्या बांधकाम साईडवर तोडफोड करण्यात आली. राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही समर्थकाना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ठाण्यातील राबोडी परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून  राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. नजीमउल्ला यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय होती नेमकी घटना ?

मनसेचे ठाण्यातील पदाधिकारी जमील शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर २०२० रोजी भरदिवसा राबोडी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जमील शेख हे मोटारसायकलवरून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोन हल्लेखोरापैकी एकाने जमील शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखेने एकाला नाशिक जिल्ह्यातून शाहिद शेख (३१) याला अटक केली होती. मात्र या हल्ल्यातील मुख्य हल्लेखोर फरार झाले होते, त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्याचे पथक मागील काही महिन्यापासून उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसले होते. हल्लेखोर हा ३ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील कठोती झील येते येणार असल्याची माहिती  ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. ठाणे पोलिसांनी युपीच्या स्पेशल टास्क फोर्स ची मदतीने कठोती झील या ठिकाणी सापळा रचून इरफान सोनू शेख मन्सुरी उर्फ राजधनीया उर्फ पंकज उर्फ मोठु (२२)  याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने आसाम आणि शाहिद नावाच्या व्यक्तीने मला या हल्ल्यासाठी बोलावून घेतले होते. यासाठी मला दोन लाख रुपये देण्यात येणार होते व हे हि हत्या ठाण्यातील एनसीपी नगरसेवक नजीमउल्ला याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

रॅपिड एक्शन फोर्स तैनात

जमील शेख यांची हत्या करणारा हल्लेखोर यूपीत पकडला गेला असून त्याने नगरसेवक नजीमउल्ला याच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आल्याची कबुली दिली असल्याची माहिती मनसेचे जमील शेख याच्या समर्थकाना शनिवारी सायंकाळी कळताच जमील शेख यांच्या समर्थकांनी नगरसेवक नजीमउल्ला याच्या कार्यालयाजवळ जाम झाले आणि त्यांनी नजीमुल्ला यांच्या कार्यालयावर हल्ला करून नजीमउल्ला यांच्या कार्यालयाजवळ उभी असलेल्या रुग्णवाहिकेची तोडफोड केली. त्यानंतर संतप्त समर्थकांनी नजिमउल्ला यांच्या बांधकाम साईडवर जाऊन तेथे तोडफोड करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन तोडफोड करणाऱ्या शेख यांच्या समर्थकांची धरपकड करून राबोडी परिसरात तसेच नजीमुल्ला यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव दलाची तुकडी आणि शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. राबोडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण राबोडी परिसराला पोलीस छावणीचे रूप आहे आहे.

तिसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू 

दरम्यान उत्तर प्रदेशात अटक करण्यात आलेल्या  इरफान सोनू शेख मन्सुरी उर्फ राजधनीया उर्फ पंकज उर्फ मोठु याचे युपी न्यायालयाकडून ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन ठाणे गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन शनिवारी रात्री ठाण्याकडे रवाना झाले आहे. दरम्यान आसाम हा तिसरा हल्लेखोर राबोडी परिसरात राहणारा असून तो या घटनेपासून फरार झाला असून  गुन्हे शाखेचे दुसरे पथक त्याचा कसून शोध घेत आहे.

- Advertisement -