घरताज्या घडामोडीमुंबईकरांनो वाहन पार्किंगची चिंता मिटली, वाहतूक पोलिसांचा नवा उपक्रम

मुंबईकरांनो वाहन पार्किंगची चिंता मिटली, वाहतूक पोलिसांचा नवा उपक्रम

Subscribe

वाहनतळ उपलब्ध नसलेल्या ठिकाणी म्हणजे ‘नो पार्किंग’ भागात वाहने उभी केल्यामुळे वाद निर्माण होऊ लागले होते. त्यामुळे हे प्रसंग टाळण्यासाठी नो पार्किंगमध्ये वाहन उभे करण्यासाठी पर्यायी जागा देण्याची योजना वाहतूक पोलिसांनी आखली आहे. वाहतूक पोलिसांकडून हा ‘स्ट्रीट पार्किंग’चा नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

वाहन पार्किंगची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने स्ट्रीट पार्किंग नवा उपक्रम वाहतूक पोलिसांनी हाती घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडे वाहन पार्किंगबाबत तक्रारी प्रमाण वाढले होते. इमारत जुनी असल्यामुळे वाहनतळ नाही, इमारत परिसरात पुरेशी जागा नाही, महापालिकेने उभारलेले वाहनतळ हे इमारतीपासून खूप लांब आहे, यामुळे वाहने इमारतीबाहेरील रस्त्याकडेला वाहने उभी करण्याविना पर्याय नाही, अशा तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. त्यामुळे यातील तथ्य पडताळून वाहतूक पोलिसांनी रहिवाशांना आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना वाहने रस्त्याकडेला उभी करण्याची परवानगी देणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान मुंबईत सुमारे ३६ लाख वाहने आहे. पण याच्या तुलनेत वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर पार्किंग विरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. बेकायदेशीर असलेला पार्किंगमध्ये किंवा रस्त्याकडेला उभी असलेल्या वाहनांना चाप लावून जागच्या जागी खिळवून ठेवली जात होती. पण अशा प्रकारच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे या सर्व तक्रारींमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे निकषांची पडताळणी करून रस्त्याकडेचा वाहने उभी करून दिली जाणार आहेत. त्यामुळे स्ट्रीट पार्किंगची परवानगी मागणारे तीन प्रस्ताव कफ परेड परिसरात दाखल झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – युनिफाईड डीसीपीआर: घरे होणार स्वस्त, पार्किंगचे जाचक नियम हटणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -