घरताज्या घडामोडीपनवेल-पेण-रोहा मेमू आजपासून सुरु ; अखेर प्रवाशांच्या मागणीला यश

पनवेल-पेण-रोहा मेमू आजपासून सुरु ; अखेर प्रवाशांच्या मागणीला यश

Subscribe

पेणकरांमध्ये दिलासा..

पनवेल रेल्वे स्थानकातून पनवेल,पेण-रोहा मेमू ही प्रवासी शटल रेल्वे आजपासून पुन्हा धावणार आहे. अखेर प्रवाशांच्या मागणीला यश मिळाले आहे. पेण,रोहा येथून अनेक प्रवासी कामानिमित्त पनवेल अथवा मुंबईला जात असतात. त्यामुळे ही मेमू सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना एसटीच्या महागड्या प्रवासाने लांबचा पल्ला गाठावा लागत होता. त्यामुळे ही पनवेल-पेण-रोहा मेमू पूर्ववत होण्याच्या मागणीला पेणकरांनी जोर धरला होता. तातडीने ही सेवा सुरू न केल्यास पेण-पनवेल मेमुच्या वाढदिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ‘मी पेणकर, आम्ही पेणकर’ शाश्वत समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी निवेदनाव्दारे दिला होता. त्याचबरोबर अनेक मागण्या पेणकरांनी निवेदनात केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर ही सेवा देखील बंद झाली होती. मात्र आता सर्व व्यवहार, सर्व सेवा पूर्वपदावर येत असल्याने आता बंद ठेवण्यात आलेली पेण-पनवेल शटल सेवा प्रवाशांच्या मागणीनंतर अखेर आजपासून सुरु करण्यात आली आहे.

त्याचबरोबर पेण-पनवेल-दिवा, वसई रोड, डहाणू रोड ही प्रवासी मेमु रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरू व्हावी, पेण-ठाणे ही प्रवासी रेल्वे सेवा शनिवार आणि रविवारी देखील उपलब्ध व्हावी,अलिबाग रेल्वे मार्ग प्रवासी मार्गासाठी सुरू करण्यात यावा, रोजच्या जलद सेमी आणि फास्ट, सुपर फास्ट गाड्यांना येथे स्थानकात थांबा मिळावा, गणपती, दिवाळी, होळी सुट्टी विशेष गाड्यांना पेणसह रोहे रेल्वे स्थानकात दोन मिनिटांचा थांबा मिळावा, पेणसह पनवेल, खोपोली, रोहे, कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सर्व मध्य रेल्वे स्थानकात प्रवासी विश्रांती गृह, स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रवासी नागरिक सहाय्यता केंद्र उभारावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – दिवा-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी विशेष गाड्यांना मुदतवाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -