घरताज्या घडामोडीराष्ट्रीय लोक अदालतीमधील प्रकरणे निकाली ; महाराष्ट्रात रायगडची हॅटट्रिक

राष्ट्रीय लोक अदालतीमधील प्रकरणे निकाली ; महाराष्ट्रात रायगडची हॅटट्रिक

Subscribe

महाराष्ट्रात रायगड जिल्हा तिसर्‍यांदा अव्वल ठरला आहे.

न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लोकन्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. येथे झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, ३४ हजार ५६२ प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा तिसर्‍यांदा अव्वल ठरला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी एकूण १ लाख ३३ हजार ९८९ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यापैकी दाखलपूर्व ३३ हजार ४६९ आणि प्रलंबित १ हजार ९३ प्रकरणे सामंजस्याने मिटवून निकाली निघाली. त्याद्वारे पक्षकारांना एकूण २५ कोटी १५ लाख ६२ हजार १२५ रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली. मोटार अपघात ७२ प्रकरणे मिटवून ४ कोटी ४१ लाख २० हजार १३७ रुपयांची, भूसंपादनची ५२ प्रकरणे मिटवून २१ लाख २७ हजार ३१५ रुपयांची, कलम १३८ एनआय अ‍ॅक्ट धनादेशची १३७ प्रकरणे मिटवून ४ कोटी ७८ लाख ९५ हजार ४५१ रुपयांची, कौटुंबिक ६२ प्रकरणे मिटवून ६ लाख रुपयांची, ग्रामपंचायत आणि नगर पालिका कर वसुलीची ७ हजार ९५० प्रकरणे मिटवून २ कोटी ७६ लाख ४४ हजार ८३३ रुपयांची, ट्रॅफिक चलन केसेसपैकी १८ हजार ४९५ प्रकरणे मिटवून १ कोटी ३३ लाख ६९ हजार ७५० रुपयांची वादपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली निघाली आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील विविध न्यायालयांत ३९ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलचा वापर करूनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, विधिज्ञ आणि सर्व पक्षकारांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा प्र. इंगळे आणि न्यायाधीश तथा सचिव संदीप स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.


हे ही वाचा – TET Exam : टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -