धक्कादायक! गँगरेपच्या व्हिडिओने दोन वर्ष नराधमांनी पीडितेला केले ब्लॅकमेल, आता व्हिडिओ केला व्हायरल

Rajasthan 20-year-old Alwar woman gangraped since 2019, blackmailed
धक्कादायक! गँगरेपच्या व्हिडिओने दोन वर्ष नराधमांनी पीडितेला केले ब्लॅकमेल, आता व्हिडिओ केला व्हायरल

एका तरुणीवर दोन वर्षांपासून सामूहिक बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ करून चार नराधम गेल्या महिन्यापर्यंत तिला धमकावून तिला लुटत होते. पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली होती, परंतु तिची हाक कोणीच ऐकली नाही. त्यामुळे ती पुन्हा नराधमांच्या तावडीत अडकली. पण जेव्हा आता आरोपींनी तिचा व्हिडिओ व्हायरल केला, तेव्हा पुन्हा एकदा पीडितेने पोलीसात धाव घेतली आणि हे सामूहिक प्रकरण समोर आले. गुरुवारी, पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या अलवारमध्ये घडली आहे.

पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २० वर्षांची तरुणी एप्रिल २०१९मध्ये परीक्षा देण्यासाठी अलवारमध्ये गेली होती. तिथे ती एका ओळखीचा मित्र विकास चौधरी याला भेटली. विकास आणि त्याचा मित्र भुरू सिंह जाटने तरुणीचे अपहरण केले. त्यांनी पहिल्यांदा तरुणीला ड्रग्ज दिले आणि नंतर अलावरच्या एमआयए भागात घेऊन जाऊन तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणीने सांगितले की, तिथल्या हाउजिंग सोसायटीचा गार्ड हा आरोपींसोबत मिळालेला होता. विकास आणि भुरु व्यतिरिक्त इतर लोकांनी देखील तिच्यावर बलात्कार केला.

माहितीनुसार, मे २०१९मध्ये पीडित तरुणीने मालाखेडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु तिची तक्रार दाखल केली नाही. तेव्हापासून प्रमुख आरोपी विकास आणि इतर आरोपी तिला धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करत होते. ते पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होते.

गेल्या महिन्यात २५ जूनला पीडित तरुणी या सर्व प्रकाराला त्रासली. तेव्हा तिला आरोपी गौतम सैनीने सामूहिक बलात्काराला व्हिडिओ पाठवला आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडितेला २७ जून भेटायला बोलावले. अलवारचे एसपी तेजस्विनी गौतम म्हणल्या की, ‘२८ जूनला पीडित तरुणी मला भेटली आणि याप्रकरणी एफआयआर दाखल केला. याआधारवर विकास आणि भुरु अटक करण्यात आली. तसेच इतर दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.’

पुढे एसपी तेजस्विनी गौतम म्हणाल्या की, ‘आरोपी सैनीला कुठून तरी पीडितेचा व्हिडिओ क्लिप आणि नंबर मिळाला. त्याचा सामूहिक बलात्कारमध्ये कोणतीही भूमिका नाही आहे. परंतु २५ जूनपासून तो धमकावण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान २०१९मध्ये एफआयआर नोंद करण्यास नकार दिलेला याप्रकरणी देखील चौकशी सुरू आहे. जर कोणी यात दोषी आढळला तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.’


हेही वाचा – धक्कादायक! लग्नाआधी सेक्स करणे पडले महागात, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी