BrahMos Missile : ओडिशाच्या किनार्‍यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

भारताने आज गुरुवारी 20 जानेवारीला ओडिशाच्या किनार्‍यावर सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी केली, ज्यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्याचे बळ आणखी वाढणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) नुसार, उत्तम नियंत्रण प्रणालीसह इतर नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राचे गुरुवारी सकाळी 10.45 वाजता चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीच्या लॉन्च पॅड-3 वरून प्रक्षेपण करण्यात आले.

Successful test of new version of BrahMos missile off the coast of Odisha
BrahMos Missile : ओडिशाच्या किनार्‍यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी

भारताने आज गुरुवारी 20 जानेवारीला ओडिशाच्या किनार्‍यावर सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी केली, ज्यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्याचे बळ आणखी वाढणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) नुसार, उत्तम नियंत्रण प्रणालीसह इतर नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राचे गुरुवारी सकाळी 10.45 वाजता चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीच्या लॉन्च पॅड-3 वरून प्रक्षेपण करण्यात आले. चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आजच्या क्षेपणास्त्र चाचणीला खूप महत्व आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र ही भारतीय नौदलाची प्रमुख शस्त्र प्रणाली आहे.

क्षेपणास्त्राने लक्ष्यावर अचूक मारा केल्याची माहिती डीआरडीओने केली आहे. 290 किलोमीटरच्या मूळ श्रेणीच्या तुलनेत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 ते 400 किलोमीटर इतकी जास्त असल्याचे मानले जाते. भारत-रशियन संयुक्त उपक्रम ब्रह्मोस एरोस्पेस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करते जी पाणबुडी, जहाजे, विमाने किंवा जमिनीवर आधारित प्लॅटफॉर्मवरून सोडली जाऊ शकतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे मॅक 2.8 किंवा ध्वनीच्या जवळपास तिप्पट वेगाने प्रक्षेपित होऊ शकतात.

आयएनएस विशाखापट्टणमवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या समुद्रातून समुद्रात मारा करणाऱ्या आवृत्तीची 11 जानेवारी रोजी  चाचणी घेण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल त्यांनी ट्विट करून भारतीय नौदल आणि डीआरडीओचे अभिनंदन केले.


हे ही वाचा – Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ नंतर किरण माने साकारणार ऐतिहासिक भूमिका, सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात