घरअर्थजगतदूरसंचार, वाहन,स्थावर मालमत्ता उद्योगातील नोकर्‍या घटल्या

दूरसंचार, वाहन,स्थावर मालमत्ता उद्योगातील नोकर्‍या घटल्या

Subscribe

अर्थव्यवस्था मंदावली असल्याने रोजगारनिर्मितीवर परिणाम होत आहे. दूरसंचार वाहन उद्योगामधील नवीन नोकर्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. तर ई-कॉमर्स आणि अन्न तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नवीन कामगारांना नोकरीत घेण्याचे प्रमाण सातत्याते वाढत आहे. सर्वच क्षेत्रातील नोकर्‍या कमी झालेल्या नाहीत. मात्र, वाहन क्षेत्रासह दूरसंचार क्षेत्रावर निश्चितच परिणाम झाल्याचे टीमलीझ कंपनीचे सहसंस्थापक ऋतूपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले. बँकिंग, विमा आणि ई-कॉमर्स कंपन्यांमधील नोकरभरती वाढत आहे. मात्र, दूरसंचार, वाहन उद्योग, स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायातील नोकर्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. या कंपनीने विविध २ हजार वेबसाईटच्या माध्यमातून माहिती घेतली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्के झाला आहे. हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे,असे कंपनीच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

बीएसएनएल कर्मचार्‍यांना  स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव
आमच्या स्पर्धकांपेक्षा बीएसएनमधील कर्मचार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर चर्चा करत आहोत. जवळपास 70 ते 80 हजार कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे,” अशी माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष प्रवीण कुमार पुरवर यांनी दिली. बीएसएनएलमधील कर्मचार्‍यांवर एकूण महसुलापैकी 70 टक्के रक्कम खर्च होते, असेही त्यांनी पुढे म्हटले. कर्मचार्‍यांना आकर्षक पॅकेज देऊन त्यांच्यासमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवू असे प्रवीण कुमार म्हणाले.तसेच बीएसएनएलच्या 70 ते 80 हजार कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तरी कंपनीत 1 लाख कर्मचारी असतील,असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -