मुलीही करू शकतात वडिलोपार्जित संपत्तीवर दावा; कोणाचा काय अधिकार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ मध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मानले आहेत.

प्रत्येक कुटुंबात मालमत्तेवरून वाद (Property Controversy) होतात, हे आपण पाहायले आहे. कधी भाऊ-बहिणी (Siblings) तर कधी भावांमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेवरून (Inherited Property) भांडण होतात. आई-वडील (Parents) जिवंत असेपर्यंत मालमत्तेवर दावा करू शकत नाही. परंतु, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील मालमत्तेसंदर्भात भावंड किंवा भावांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. पण, आई-वडिल जिंवत असेपर्यंत मुलांमध्ये मालमत्ता वाटून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

मालमत्तेशी संबंधित अनेक नियम आणि कायदे याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्यांच्याशी निगडित प्रश्नांमध्ये तो अडकलेला असतो. मालमत्तेशी संबंधित माहिती अभावी मालमत्तेशी संबंधित वाद होतात. यावेळी लोकांनी मालमत्तेचे नियम आणि कायदे समजून घेणे गरजेचे असते. वडिलोपार्जित मालमत्तेवर चार पिढ्या दावा करू शकतात. या दाव्यासाठी ठराविक वेळ मिळतो. यानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार संपुष्टात येतो.

वडिलोपार्जित मालमत्तेवर किती वर्षे दावा करू शकतो

वडिलोपार्जित मालमत्तेवर किती वर्षे दावा करू शकता, असे प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कायद्यानुसार, जर एखाद्याला असे वाटत असेल की एखाद्या मालमत्तेत आपल्या वडिलोपार्जित हक्क आहे आणि त्यांला चुकीच्या पद्धतीने इच्छापत्रातून वगळण्यात आले आहे. तर ती व्यक्ती न्यायालयात जाऊन १२ वर्षाच्या आत न्याय मागू शकते. त्या व्यक्तीने १२ वर्षानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा न केल्यात हक्क गमावला जाऊ शकतो. यानंतर त्या व्यक्तीकडे वैध कारण असेल तर न्यायालय त्याचे म्हणणे ऐकून घेईल किंवा मालमत्ता त्यांच्या हातातून निघून जाऊ शकते.

वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क हिरावून घेऊ शकत नाही

वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क कोणी हिरावून घेणे सोपे नाही. आई-वडील आपल्या मुलांना त्यांच्या कामावलेल्या मालमत्तेतून बाहेर काढू शकतात. परंतु, न्यायलयात अशी प्रकरणे समोर आली आहेत की, न्यायालयाने वडिलोपार्जित मालमत्तेतूनही मुलाला बाहेर काढण्यास परवानगी दिली नाही.

चार पिढ्या कुटुंबात विभक्त होता कामा नये

आपल्या पणजोबा, आजोबा आणि वडिलांकडून मिळालेल्या मालमत्तेला वर्डिलोपार्जित मालमत्ता म्हणतात. चार पिढ्या कुटुंबात विभक्त होता कामा नये. एकाही पिढीत घराची विभागणी झाली तर ती मालमत्ता वडिलोपार्जित राहणार नाही. म्हणजे पालक देखील आपल्या मुलांना आता वारशाने मिळालेल्या मालमत्तेतून वगळू शकतात. प्रत्येक मालमत्ता वडिलोपार्जित नसते.

हिंदू-मुस्लिममधील मालमत्ता विभाणीचे वेगळे नियम

हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये वेगवेगले नियम आहेत. हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ मध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मानले आहेत. जेव्हा हिंदू व्यक्ती मृत्यूपत्र न बनवता मरण पावते. तेव्हा त्या व्यक्तीची संपती त्याचे वारस, नातेवाईकांमध्ये कायदेशीररित्या वाटली जाते.

अशी आहे कायद्यातील तरतूद

हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ अन्वये जर मालमत्तेचा मालक म्हणजे वडील किंव कुटुंबप्रमुख मृत्यूपत्र न करता मरण पावला, तर ती मालमत्ता वर्ग १ वारसांंना मुलगा, मुलगी, विधवा, आई, मुलगा यांना दिली जाते. क्सस १ मध्ये नमूद केलेल्या वारसांची उपलब्धता न झाल्यास, वर्ग २ च्या वारसांना (मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण) मालमत्ता देण्याची तरदूद आहे. यात  हिंदू उत्तराधिकार कायद्यात बौद्ध, जैन आणि शीख समुदायांचाही समावेश आहे.