Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन PVR आणि INOX ची 50 चित्रपटगृह 6 महिन्यात होणार बंद... कंगनाने दिली...

PVR आणि INOX ची 50 चित्रपटगृह 6 महिन्यात होणार बंद… कंगनाने दिली प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अशातच तिने आता भारतातील चित्रपटगृहांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नुकतीच कंगनाने एका ट्वीटला प्रतिक्रिया दिली आहे ज्यात तिने दावा केला आहे की, PVR आणि INOX यांसारख्या चित्रपटगृहांना चौथ्या तिमाहीत 333 कोटींचा तोटा झाला असून त्यामुळे 50 चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

PVR आणि INOX ची 50 चित्रपटगृह 6 महिन्यात बंद होणार

चित्रपटगृहांबाबत ही धक्कादायक माहिती ट्रेड एक्सपर्ट गिरीश जोहर यांनी शेअर केली ज्यात त्यांनी लिहिलंय की, “अहवालानुसार, 2023 या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत PVR आणि INOX ला 333 कोटी रुपयांचा तोटा झाला तर गेल्या वर्षी 170 कोटींचा तोटा झाला आहे. आता PVR आणि INOX पुढील 6 महिन्यांत 50 चित्रपटगृहे बंद करण्याचा विचार करत आहे.”

- Advertisement -

गिरीश जोहर यांच्या ट्वीटला कंगनाने प्रतिक्रिया दिला आहे. ती म्हणाली की, “आपल्या देशात आणखी चित्रपटगृहांची गरज आहे. आम्हाला अधिक स्क्रीन्सची गरज आहे, चित्रपटगृह बंद होणे हे चित्रपट उद्योगासाठी चांगले नाही. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे खूप महाग झाले आहे, कुटुंबासोबत चित्रपट बघायला जाणे म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्तीच्या पगारामधील मोठी रक्कम खर्च होण्यासारखे आहे. यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे.”

कंगना राणौतचे आगामी चित्रपट

- Advertisement -

कंगनाचा लवकरच ‘तेजस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. शिवाय कंगना ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे.

 


हेही वाचा :

‘अवतार 2’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -