घरअर्थजगतLICची नवी योजना; 'बचत प्लस योजन'चे जबरदस्त फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

LICची नवी योजना; ‘बचत प्लस योजन’चे जबरदस्त फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

Subscribe

सध्याच्या घडीला पाहिला गेल तर सर्वचजण पैसे कमवण्यासाठी काम करत असतात. मग कोणाला घर खरेदी करायचे असते. तर काही जणांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे कमवायचे असतात. तर बरेच जण सेवानिवृत्त झाल्यानंतर राहिलेले दिवस आंनदाने जगण्यासाठी पैसे कमवून ठेवतात. मात्र, या सर्व गोष्टींसाठी बचतही करावीच लागते आणि बचत करण्यासाठी विविध योजनांचा देखील वापर करण्यात येतो. यामध्ये बरेच ग्राहक हे सर्वात मोठी जीवन विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)चा वापर करतात. ही विमा कंपनी प्रत्येक वेळी ग्राहकांच्या फायद्याकरता काही खास योजना आणत असते. नुकतीच या कंपनीने एक योजना आणली आहे. ज्याचा तुम्हाला अधिक फायदा होण्यास मदत होईल. ‘बचत प्लस’, असे या योजनेचे नाव आहे.

कोणती आहे ही योजना?

एलआयसीने ‘बचत प्लस’ योजना बाजारात आणली आहे. जी योजना बचतीबरोबरच सुरक्षा पुरवते. कंपनीने म्हटले आहे की, या योजनेत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ वर्षांच्या मुदतीसह आर्थिक सहाय्य देते. तसेच त्या दरम्यान जर पॉलिसीधारक मुदतपूर्तीच्या कालावधीपूर्वी मृत्यूमुखी पडला तर त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळणार.

- Advertisement -

अशी खरेदी करु शकता पॉलिसी

ही पॉलिसी खरेदी करायची असल्यास एलआयसी वेबसाईट www.licindia.in द्वारे ऑनलाईन खरेदी करु शकता. तसेच एजेंट्स किंवा इतर मध्यसंस्थांद्वारे ऑफलाईनद्वारे देखील खरेदी करता येऊ शकते.

काय आहेत खास बाबी

  • किमान मूलभूत रक्कम १ लाख रुपये आहे, कोणतीही मर्यादा नाही
  • प्रीमियम पेमेंटच्या दोन्ही पद्धतींसाठी उच्च मूलभूत विमा रक्कमेत सूट
  • ही योजना तुमच्या कर्जाच्या सुविधेद्वारे पैशांच्या गरजा भागवते
  • पॉलिसीची मुदत, प्रवेशाचे वय, मॅच्युरिटी वय इत्यादींसाठी पात्रता अटी प्रीमियमच्या रक्कमेनुसार आणि प्रस्तावाद्वारे निवडलेल्या पर्यायांनुसार असतील
  • सम एश्योर्ड ऑन डेथच्या बाबतीत प्रीमियम पेमेंटच्या दोन्ही पद्धतींना सूट

    हेही वाचा – भारताला मिळाली तीसरी लस; रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या वापराला परवानगी


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -