Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कडक लॉकडाऊन करुन काही साध्य होणार नाही, आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा निर्माण...

कडक लॉकडाऊन करुन काही साध्य होणार नाही, आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करा

राज्य सरकारने लॉकडाऊनचा पर्याय सोडून कोरोना रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजान करण्याची गरज

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्यमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु कोरोना रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोर आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास तो परवडणारा नसेल असे म्हणत भाजपने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला आहे. पुन्हा लॉकडाऊन करुन नगारिकांना घरात बसवून काही साध्य होणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही त्यामुळे कोरोनावर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात फक्त आठवडाभर किंवा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन करुन कोरोना संपणार नाही. लॉकडाऊन लावल्याने कोरोना कमी होईल परंतु त्याचे संपूर्ण नष्ट होणार नाही.

- Advertisement -

राज्य सरकारने लॉकडाऊनचा पर्याय सोडून कोरोना रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजान करण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच बिनचूक टेस्टिंगसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. कोरोना चाचणीसाठी बिनचूक टेस्टिंग किटसाठी पाठपुरावा केला पाहिजे, अजूनही नागरिक कोरोना चाचण्यांसंदर्भात लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. टाटाने बिनचूक प्रकारच्या टेस्टिंगचे किट उपलब्ध करुन दिले होते. परंतु हे किट कुठे गेले याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन अशा वस्तूंचा पुरवठा आणि उपलब्धता करुन देण्यावर भर दिला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कोरोना रुग्णालयांना या उपाययोजना पुरवल्या पाहिजेत असे भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रत्येक जिल्ह्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. सर्व जिल्हानियोजनामध्ये प्रत्येक जिल्ह्याला दहा आमदार प्रमाणे २० कोटी रुपये निधी उपलब्ध असतो त्यासोबतच शासनाने अतिरिक्त २० कोटी असे मिळून ४० कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्याला दिल्यास पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -