घरअर्थजगतआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकपदी रघुराम राजन?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकपदी रघुराम राजन?

Subscribe

रिर्झव्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या पदासाठी भारतीय व्यक्तीच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार रघुराम राजन यांचे नाव चर्चेत आले आहे. राजन यांच्याशिवाय बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी, डेव्हिड कॅमरून सरकारमध्ये चॅन्सलर राहिलेले जॉर्ज ओसबॉर्न आणि नेदरलँडचे माजी वित्त मंत्री जेरॉइन डिजस्सेलब्लोएम यांच्या नावांचीही चर्चा आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या क्रिस्टिन लेगार्ड यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतरही 12 सप्टेंबरपर्यंत ते कारभार सांभाळणार आहे. तत्पूर्वी रघुराम राजन हे बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनवण्याचीही चर्चा होती. परंतु राजन यांनी मी या पदासाठी अर्ज केलेला नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळून लावले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखाचे पद युरोप आणि अमेरिकेच्या बाहेरच्या व्यक्तीला दिले जाते. राजन हे सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकवतात. ब्रिटनच्या परराष्ट्र प्रकरणातील समितीचे अध्यक्ष टीम टुगेनडत यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांना पत्र लिहून रघुराम राजन यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख बनवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -