घरअर्थजगतSmall Savings Scheme Rate: छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, मग...

Small Savings Scheme Rate: छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, मग व्याजदर किती असेल ?

Subscribe

छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) मोदी सरकारने या योजनांचे व्याज दर आहेत तसेच सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता व्याज दरात कोणताही बदल होणार नाही. या घोषणेमुळे ग्राहकांना मोठ्याप्रमाणात दिलासा मिळणार आहे.

कारण यावर्षी ३१ मार्च रोजी जेव्हा चालू आर्थिक वर्षाच्या (२०२१ ते २२) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) व्याज दर जाहीर करण्यात आले तेव्हा व्याजदारात कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. यात बंगाल निवडणुकीमुळे देशातील वातावरण ढवळून निघण्याबरोबरचं त्याचा विपरित परिणाम राजकारणावर होणार हे लक्षात घेऊन दुसर्‍याच दिवशी म्हणजेच म्हणजे १ एप्रिल रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वत: हा आदेश मागे घेण्याची घोषणा केली. सीतारामन यांनी त्या आदेशाला मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची चूक झाल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

‘या’ बचत योजनांच्या वेगवेगळ्या स्कीमवर जुलै ते सप्टेंबर दरम्यान किती व्याज दर असेल?

बचत खाते – ४%

एक ते तीन वर्षाची मुदत ठेव ( 1 to 3 year fixed deposit) – ५ .५%

- Advertisement -

पंचवार्षिक मुदत ठेव (5 year fixed deposit) – ६.७%

5 वर्षे आवर्ती ठेव (recurring deposit)- ५.८%

ज्येष्ठ नागरिक बचत योजना – ७.४%

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र – ६.८%

पीपीएफ (PPF) – ७.१%

किसान विकास पत्र – ६.९%

सुकन्या समृद्धी खाते – ७.६%


राखीव वनक्षेत्रात सुविधांना बंदी; महापालिका आयुक्तांचे आदेश


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -