घरक्राइमCrime : बोगस दस्तावेजाद्वारे पर्सनल लोन घेऊन बँकेची 26 लाखांची फसवणूक; सहाजणांविरुद्ध...

Crime : बोगस दस्तावेजाद्वारे पर्सनल लोन घेऊन बँकेची 26 लाखांची फसवणूक; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

बोगस दस्तावेज सादर करून पर्सनल लोन घेऊन एका खाजगी बँकेची सुमारे 26 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे

मुंबई : बोगस दस्तावेज सादर करून पर्सनल लोन घेऊन एका खाजगी बँकेची सुमारे 26 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (26 lakh bank fraud by taking personal loan through bogus documents case registered against six persons)

अमीतकुमार शर्मा, अभिषेक अग्रवाल, रमेशकुमार, वरुण शर्मा ऊर्फ रिषी शर्मा, विवेक सिंग ऊर्फ कर्ण सिंग आणि दर्शन सिंग ऊर्फ अजय सिंग अशी या सहाजणांची नावे असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 44 वर्षांचे तक्रारदार कांदिवली येथे राहत असून वांद्रे येथील बीकेसीच्या एका खाजगी बँकेत विभागीय मॅनेजर म्हणून काम करतात. बँकेत होणार्‍या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करून या फसवणुकीची पोलिसात तक्रार करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर आहे. बँकेची एक अधिकृत वेबसाईट असून त्यात अनेकजण ऑनलाइन पर्सलन लोनसाठी अर्ज करतात. त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर त्यांना पर्सनल लोन दिले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाने संगीत दिग्दर्शकाची फसवणूक; आरोपीला अटक

काही दिवसांपूर्वी त्यांच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर काहीजणांनी ऑनलाईन पर्सनल लोनसाठी अर्ज केले होते. या अर्जासोबत त्यांनी त्यांचे वैयक्तिक कागदपत्रे जोडली होती. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर अमीतकुमार शर्मा, अभिषेक अग्रवाल यांना प्रत्येकी 4 लाख 59 हजार, रमेशकुमारला 2 लाख 50 हजार, दर्शनकुमार, वरुणकुमार व विवेक सिंग यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन देण्यात आले होते. त्यापैकी वरुण शर्मा, दर्शन सिंग आणि विवेक सिंग यांनी बँकेत बोगस दस्तावेज सादर केल्याचे नंतर उघडकीस आले होते.

- Advertisement -

लोनसाठी दिलेले पॅनकार्ड बरोबर होते, मात्र त्यावरील पत्ता आणि फोटो वेगळा होता. ते पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नव्हते. अशा प्रकारे त्यांनी बोगस दस्तावेज सादर करून बँकेतून 26 लाख 68 हजार रुपयांचे पर्सनल लोन घेऊन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी संबंधित सहाजणांविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमीत शर्मा, अभिषेक अग्रवाल, रमेशकुमार, वरुण शर्मा, विवेक सिंग आणि दर्शन सिंग यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करून बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हेही वाचा – Salman khan : सलमान खानच्या घराजवळील गोळीबाराचा कट बिहारमध्ये शिजला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -