घरक्राइमCrime : चारित्र्याचा संशय डोक्यात शिरला; पतीने दारूच्या नशेत पत्नीसह दोन मुलींना...

Crime : चारित्र्याचा संशय डोक्यात शिरला; पतीने दारूच्या नशेत पत्नीसह दोन मुलींना घरात कोंडून पेटवले

Subscribe

अहमदनगर : आज धुनिवंदनाच्या दिवशीच अहमदनगर हादरलं आहे. शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा याठिकाणी पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलींना घरात कोंडून जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या कृत्यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. पिंपळगाव लांडगा गाव अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर 15 किमी अंतरावर आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सुनील लांडगे (45) याला ताब्यात घेतले आहे. (Crime News Suspicion of character entered the head The drunken husband locked his wife and two daughters in the house and set them on fire)

हेही वाचा – Wedding invitation viral : लग्नात भेटवस्तू नको, पण मोदींना मतदान करा; वराच्या वडिलांची अनोखी मागणी

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, आरोपी सुनील लांडगे हा शेती व मजुरीचं काम करतो. त्याने आज सकाळी 9.30 ते 10 दरम्यान पत्नीवरील चारित्र्याचा संशयावरून हे कृत्य केलं. सुनील लांडगे यांने पत्नी व दोन लहान मुलींना घरात कोंडून घेतले. त्यानंतर त्याने गावातील महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावरून डबा भरून पेट्रोल आणले आणि खिडकीतून पेट्रोल टाकून घर पेटवून दिले. या घटनेत त्याची पत्नी लीला (26), मुलगी साक्षी (14) व दुसरी मुलगी खुशी (13 महिने) या तिघींचा जळून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे घर पेटवून दिल्यानंतर सुनील लांडगे हा घरासमोरच झाडाच्या सावलीत बसून होता.

हेही वाचा – Baramati Constituency : जी लेक माहेरवाशीण…; सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या वहिनी मैदानात

- Advertisement -

घरातून धूर निघू लागल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरातून पत्नी व मुलींचा ओरडण्याचा आवाज येत होता. परंतु तोपर्यंत संपूर्ण घर पेटले होते आणि घराला कुलूप लावलेले असल्यामुळे नागरिकांना काहीच मदत करता आली नाही. थोड्या वेळाने तिघींचा मृत्यू झाला. घटनास्थळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी फौजफाट्यासह धाव घेतली व सुनील लांडगे याला ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील लांडगे याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -