घरक्रीडाIPL 2024 : प्लेऑफ सामने मुंबईत नाही तर या दोन शहरांत; फायनल...

IPL 2024 : प्लेऑफ सामने मुंबईत नाही तर या दोन शहरांत; फायनल कुठे पाहा?

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामाची दमदार सुरुवात झाली आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक जाहीर न करता पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. अशातच आता आयपीएल प्रेमींसाठी मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने आयपीच्या प्लेऑफ आणि अंतिम सामना कुठे होणार याबाबत माहिती दिली आहे. (IPL 2024 Playoff matches not in Mumbai but in these two cities Where to watch the final)

हेही वाचा – Wedding invitation viral : लग्नात भेटवस्तू नको, पण मोदींना मतदान करा; वराच्या वडिलांची अनोखी मागणी

- Advertisement -

आयपीएल 2024 चे प्लेऑफ आणि अंतिम सामने अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना 21 आणि 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवा जाईल, तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल. क्वालिफायर 2 सामना 24 मे रोजी आणि अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाईल. अशी माहिती क्रिकबजने दिली आहे.

8 एप्रिलपासून दुसरा टप्पा

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील 21 सामन्यांच्या घोषणेनंतर आता दुसरा टप्पा 8 एप्रिलपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक तयार केले आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना खेळताना दिसणार आहे. चेन्नईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Congress candidates : काँग्रेसकडून सहावी यादी जाहीर; पाच उमेदवारांचा समावेश

पंजाब आणि राजस्थान दुसऱ्या होम ग्राउंडवर खेळणार

आयपीएल दुसऱ्या पर्वाच्या वेळापत्रकानुसार पंजाब किंग्ज त्यांच्या दुसऱ्या होम ग्राउंडवर म्हणजेच धर्मशाला येथे दोन सामने खेळताना दिसणार आहे. पंजाब 5 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि 9 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना दिसणार आहे. तर पंजाब व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स त्यांच्या दुसऱ्या होम ग्राउंड म्हणजेच गुवाहाटी येथे दोन सामने खेळणार आहे. 15 मे रोजी राजस्थान पंजाब किंग्जविरुद्ध गुवाहाटीच्या मैदानात उतरणार आहे. तर राजस्थानचा दुसरा सामना 19 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील हा सामना लीग टप्प्यातील शेवटचा सामना असेल. या सामन्यानंतर, 20 मे रोजी विश्रांती असेल तर 21 मे पासून प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -