घरक्राइमसंतापजनक! बलात्काराची तक्रार करायला जाणाऱ्या महिलेवर पोलिसाकडून बलात्कार

संतापजनक! बलात्काराची तक्रार करायला जाणाऱ्या महिलेवर पोलिसाकडून बलात्कार

Subscribe

एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडितीवर पोलिसांनी केला बलात्कार.

माणुसकीला काळीमा फासणारी आणि अमानुषतेचा कळस ओलांडणारी धक्कादायक उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेलेल्या महिलेवर पोलिसाकडून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूरमध्ये एक ३५ वर्षीय महिला राहते. ही महिला ३० नोव्हेंबर रोजी मदनपुरा येथे रिक्षाने जात होती. मात्र, अचानक रिक्षा बंद पडली. रिक्षात बिघाड झाल्याने रिक्षा चालू होणे शक्य नव्हते. त्यामुळे महिलेने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. तसेच तो रस्ता देखील सुमसाम होता. दरम्यान, महिला चालत असताना अचानक पाच तरुण त्याठिकाणी आले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

- Advertisement -

दरम्यान, पीडित महिला जलालाबाद पोलीस स्थानकात तक्रार दाखल करायला गेली, तेव्हा पोलीस अधिकारी विनोद कुमार याने तिला एका खोलीत नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा पीडित महिलेने वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. जर पोलीस अधिकाऱ्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलिसांनी म्हटले आहे.


हेही वाचा – बहिणीने भावाकडे मागितली आर्थिक मदत, भावाने दिला विष पिण्याचा सल्ला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -