घरक्राइम'त्याला' नग्न करून नाचायला लावले अन् व्हिडीओही बनवला; पैशांसाठी मित्रच बनले शत्रू

‘त्याला’ नग्न करून नाचायला लावले अन् व्हिडीओही बनवला; पैशांसाठी मित्रच बनले शत्रू

Subscribe

पुणे: मागील काही दिवसांपासून पुणे काही विशिष्ट घटनांनी चर्चेत राहत आहे. गुन्हेगारीने या शहरात कळस गाढला असून, याच पुण्यातून आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काहींनी त्यांच्यातील एकाला नग्न करत त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो गावातील मित्रांच्या ग्रृपवर शेअर केला. तर ते एवढ्यावरच थांबले नसून, त्याच्याकडी 60 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी तब्बल तीन ते चार महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (He was made to dance naked and also made a video Friends became enemies for money)

ही घटना पुण्यातील येरवडा भागातील आहे. एका तरुणाला त्याचा भाऊ आल्याची बतावणी करत त्याला फ्लॅटवर बोलावून घेत कपडे काढून नग्न केले. त्याला नग्न अवस्थेतच नाचायलाही लावले. यावेळी त्यांनी त्याचा व्हिडीओही बनवला आणि तो व्हायरलसुद्धा केला. यावेळी आरोपींनी त्याच्याकडील 60 हजार रुपयेसुद्धा काढून घेतले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर पुढील काही महिने ते त्याची मानसिक आणि आर्थिक छळवणूक करतच राहले.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल? उज्ज्वल निकम यांचे सूचक वक्तव्य

तब्बल पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल

घडलेली घटना ही 13 ते 14 जुलै 2023 दरम्यानची आहे. या घटनेतील आरोपी सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंत राव भोसले (सर्व रा. एकता हाऊसिंग सोसायटी येरवडा, पुणे) हे सध्या फरार असून, या प्रकरणी 33 वर्षीय पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Breaking : डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील प्रकरण आलं अंगलट?

पाच महिने सुरू होता मानसिक छळ

आरोपीपैकी सोमनाथ राजभोज याने पीडित तरुणाला फोन करून तुझा भाऊ फ्लॅटवर आला असून, त्याला भेटण्यासाठी ये अशी बतावणी करत त्याला फ्लॅटवर बोलावले. तो आल्यानंतर आधी त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला नग्न करून काहींनी त्याचा त्याच अवस्थेत व्हिडीओ बनवला आणि तो व्हाटसअपवर शेअरसुद्धा केला. त्यानंतर तब्बल पाच महिने म्हणजे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत ते सगळेजण पीडित तरुणाला व्हिडीओचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे उकळत असत. या सगळ्या प्रकरणाला कंटाळून त्याने शेवटी पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -