घरक्राइमसमीर वानखेडेंना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! सद्गुरु रेस्ट्रो बारचे लायसन्स रद्द

समीर वानखेडेंना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! सद्गुरु रेस्ट्रो बारचे लायसन्स रद्द

Subscribe

या लायसन्सचा उल्लेखही संपत्तीच्या हिशोबात केला आहे. तर या उद्योगातून मिळणाऱ्या मिळकतीचा उल्लेखही प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये आहे. असं समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले.

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्यापासून एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे वादात सापडले आहेत. अशात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्यांनी एक मोठा दणका दिला आहे. नवी मुंबईतील त्यांच्या मालकीच्या सद्गुरु रेस्ट्रो बारचे लायसन आता रद्द करण्यात आलेय.

नवी मुंबईतील वाशी परिसरात समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा सद्गुरु रेस्ट्रो बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर १९९७ रोजी या बारसाठीचे लायसन देण्यात आले होते. मात्र हे लायसन 31 मार्च 2022 पर्यंतच वैध आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही समीर वानखेडेंवर टीका केली होती. परंतु ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आता या बारचे लायसन रद्द केले आहे. समीर वानखेडेंच्या वयात तफावत आढळल्याने लायसन्स रद्द केल्याचे कारण देण्यात आलेय.

- Advertisement -

समीर वानखेडे यांनी यासंदर्भात यापूर्वीचं स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यापासून हे लायसन्स त्यांच्या नावे आहे. मात्र या लायसन्ससंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर काहीच नाही. सेवेत रुजू झाल्यापासून 2006 पासून या बार आणि रेस्टॉरंटची माहिती वार्षिक स्थावर मालमत्तेत देतोय. तसेच या लायसन्सचा उल्लेखही संपत्तीच्या हिशोबात केला आहे. तर या उद्योगातून मिळणाऱ्या मिळकतीचा उल्लेखही प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये आहे. असं समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले.


PM Modi On Budget 2022 : गरिबांचा व्होटबँक म्हणून वापर झाला -पंतप्रधान मोदी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -