घरक्राइमऔरंगाबादमध्ये आत्महत्येचा व्हिडिओ करुन तरुणी बेपत्ता

औरंगाबादमध्ये आत्महत्येचा व्हिडिओ करुन तरुणी बेपत्ता

Subscribe

औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या कन्नड येथील एका तरुणीने आत्महत्येचा व्हिडिओ तयार केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र आत्महत्येचा व्हिडिओ तयार करुण आत्महत्या करणारी ही मुलगी सध्या बेपत्ता झाली आहे. कन्नड पोलिसांकडून या तरुणीचा शोध सुरु आहे. या तरुणीनी आत्महत्या केला असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियार प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ करत असताना ही तरुणी ज्या विहिरीजवळ उभी आहे त्या विहिरीचा शोध पोलीस घेत आहेत. कदाचित व्हिडिओ तयार करुन तरुणीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

औरंगाबादच्या कन्नड येथे राहणारी ही तरुणी गेली काही दिवसांपासून तणावात असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून लक्षात येत आहे. काही घरगुती कारणांमुळे तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या मागे दिसणारे ठिकाण जर कोणाला माहिती असेल तर ते ठिकाण पोलिसांना कळवावे असे आवाहन कन्नड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

आई बाबा काल रात्री जे काही झाले ते तुम्हाला माहिती आहे. खूप दिवसांपासून माझ्या मनात असे विचार येत होते. मला माहिती आहे मला होणारा त्रास तुम्हाला ही होत आहे. मात्र आता माझी हिंमत संपली आहे. मी आता ठरवल आहे की सर्वापासून दूर निघून जायचे आहे. पुढे काय होईल हे मला माहिती नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. या गोष्टी होणारच होत्या. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका असे या तरुणीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत तरुणाची आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -