घरदेश-विदेश३ युद्ध लढलेले मेजर जनरल बीके महापात्रा यांचे निधन

३ युद्ध लढलेले मेजर जनरल बीके महापात्रा यांचे निधन

Subscribe

दिग्गज लष्कर अधिकारी मेजर जनरल बी.के. महापात्रा यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील रुग्णालयात अखेरचा त्यांनी श्वास घेतला.

मेजर जनरल निवृत्त बसंतकुमार महापात्रा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील रुग्णालयात अखेरचा त्यांनी श्वास घेतला. दिग्गज लष्कर अधिकारी मेजर जनरल बी.के. महापात्रा यांना लढाऊ अधिकारी म्हणून भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स (टॅंक) वर नेण्यात आले. त्यांनी चार दशके भारतीय लष्कराची सेवा केली. संरक्षण क्षेत्रात 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. महापात्रा यांनी १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भाग घेतला होता. भारत सरकारकडून त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडलने गौरवण्यात आले होते.

“ओडिशाने आपल्या प्रख्यात पुत्र मेजर जनरल (निवृत्त) बसंतकुमार महापात्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महापात्रा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना त्यांचे धैर्य, शिक्षण आणि परोपकारी कार्यात त्यांचे योगदान यामुळे ते कायम स्मरणात राहतील. #RIP,असे “श्री पटनायक ट्विटरवर म्हणाले.

- Advertisement -

बसंतकुमार महापात्रा यांचा मृतदेह ‘कटक’च्या चांदिनी चौक येथील निवासस्थानीआला, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. त्यांना अतिविशिष्ठ सेवा पदक (ए.व्ही.एस.एम) प्रदान करण्यात आले होते. सेवेतून निवृत्तीनंतर , महापात्रा भुवनेश्वरमधील भारतीय विद्या भवन संप्रेषण आणि व्यवस्थापन केंद्र व कटक आणि टांगीमधील डी.ए.व्ही पब्लिक स्कूलसह अनेक शैक्षणिक संस्थांशी संबंधित होते.


हे ही वाचा – धक्कादायक! गाडलेल्या महिलेचा मृतदेह आला कब्रस्तानातून बाहेर आणि…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -