दिल्लीतील हिंसाचारातील मृतांचा आकडा पोहचला २० वर

शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश

ib ministry stay on telecast of two kerala channels for reporting of delhi violence
दिल्ली हिंसाचार.

दिल्लीत सीएएवरून सलग तिसर्‍या दिवशी हिंसाचार सुरू आहे. हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून हिंसाग्रस्त भागातील शाळा, कॉलेज बुधवारीही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आल्या आहेत. तसंच काल रात्री उशीर अजित डोवालांनी पाहणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी देखील बैठक घेऊन या हिंसाचार संदर्भात आढावा घेणार आहेत.

सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात

दिल्लीतील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झालेत. हिंसाचारात ५६ पोलिस आणि १४० पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहेत.

अमित शहा याचं दिल्लीकर जनतेला शांततेचे आवाहन

मंगळवारीही काही भागात हिंसक घटना घडल्या, असे रंधवा म्हणाले. तर हिंसाचारात १३ जण ठार झाल्याची माहिती गुरू तेग बहादूर हॉस्पिटलने दिली आहे. दिल्ली हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिला. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असे सांगण्यात आले. तर अमित शहा यांनी दिल्लीकर जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. आफवांवर विश्वास ठेवू नका, असे म्हटले आहे.

दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

हिंसाचारग्रस्त भागात दिल्ली पोलिसांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्लेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना हे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच उत्तर दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले नसल्याचे दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी सांगितले. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी तसे आदेश देण्याचे म्हटले आहे.

ड्रोनद्वारे केली जातेय टेहाळणी

तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत आहे. तसंच हिंसाचार झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हिंसेच्या घटनेनंतर भजनपुरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय. तर खजुरीखासमध्ये रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.