भारतामध्ये दीड वर्षांत कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार, प्रौंढांना बुस्टर डोस देण्यास सुरुवात

सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एकूण 200 करोड नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी हा लसीकरणाचा आकडा पार झाला. गेल्या वर्षी 16 जानेवारी 2021 मध्ये कोरोना विषाणू विरूद्द लढण्यासाठी लसीकरणाची मोहिम सुरू करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयच्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 10 लाख डोस देण्यात आला असून आत्तापर्यंत एकूण 199.98 करोडपेक्षा जास्त लोकांना जास्त डोस देण्यात आले आहेत.

सरकारने जाहिर केला लसीकरणाचा आकडा
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 18 ते 59 वयोगटातील लोकांमध्ये आत्तापर्यंत एकूण 1.06 करोड लोकांचे लसीकरण झाले आहे. तसेच 60 वयोगटापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये 2.8 करोड नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
12 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये 3.79 करोड मुलांचे पहिला डोस पूर्ण झाला असून 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये 6.08 करोड मुलांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.

जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले होते लसीकरण
गेल्या वर्षी 16 जानेवारी 2021 मध्ये कोरोना विषाणू विरूद्द लढण्यासाठी लसीकरणाची मोहिम सुरू करण्यात आली होती. यावेळी लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली होती. ज्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले होते. मार्च महिन्यात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली ज्यात 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना तसेच 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात आले होते.

Booster Dose साठी विशेष मोहिम
केंद्र सरकारच्या आदेशानुसार 15 जुलै पासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना सरकारी केंद्रांवर मोफत Booster Dose देण्याचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी 15 लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला.

 


हेही वाचा :कोरोना लसीकरणसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची दिलासादायक माहिती