घरताज्या घडामोडी2000 नोटवापसी: ज्यांच्याकडे काळा पैसा त्यांच्यासाठी भव्य स्वागत कार्यक्रम; काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

2000 नोटवापसी: ज्यांच्याकडे काळा पैसा त्यांच्यासाठी भव्य स्वागत कार्यक्रम; काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

'हा 2 हजारांचा एक्सचेंज प्रोग्राम नाही. हा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यासाठी भव्य स्वागत कार्यक्रम आहे. काळ्या पैशासाठी एक खिडकी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून 30 सप्टेंबरपर्यंत सर्व नोटा जमा करायच्या आहेत', अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

‘हा 2 हजारांचा एक्सचेंज प्रोग्राम नाही. हा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यासाठी भव्य स्वागत कार्यक्रम आहे. काळ्या पैशासाठी एक खिडकी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून 30 सप्टेंबरपर्यंत सर्व नोटा जमा करायच्या आहेत’, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, कोणी विचारणार नाही – तू कोण आहेस? तुझा पत्ता काय आहे? तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? असे सवालही गौरव वल्लभ यांनी उपस्थित केले. (2000 Note demonetization Grand welcome program for black money holders Congress Slams Modi Government)

नोटबंदीच्या काळात आणलेलली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले गौरव वल्लभ?

“काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय रिझर्व बँकेने एक स्पष्टिकरण दिले की, एकदा जा आणि 10 नोटा बदलून पुन्हा बाहेर या. दिवसातून 20 वेळा जायचं असेल तर 20 वेळा जा. 40 वेळा जायचं असेल तर 40 वेळा जा. पण चाळीस वेळा जाता येत नाही. कारण मोठी लाईन आहे. दिवसातून पाच ते सहा वेळा हे काम करू शकता. पण तुम्हाला कोणी विचारणार नाही की, ही नोट कोणाची आहे? ही नोट कुठे मिळाली? आपल्या उत्पन्नावरील पॅनकार्ड नंबर काय आहे? आधार कार्ड नंबर काय आहे? हे विचारणार नाही. इनकम टॅक्स रिटर्न फाईल काढायची असेल तर, त्याला आधार कार्ड लिंक करणे बंधनकार आहे. पण या 10 नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत कितीही वेळा गेलात तरी, कोणीही काही विचारणार नाही”, असे गौरव वल्लभ म्हणाले.

- Advertisement -

“काळ्या पैशाचे उद्दातीकरण केले जात आहे. काळ्या पैशासाठी एक खिडकी उघडण्यात आली आहे. या खिडकीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत कितीही वेळा नोटा बदलीसाठी या तुम्हाला कोणीही काही विचारणार नाही. तू कोण आहेस? तुझा पत्ता काय आहे? तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? हे म्हणजे हा 2 हजारांचा एक्सचेंज प्रोग्राम नाही. हा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यासाठी भव्य स्वागत कार्यक्रम आहे”, अशा शब्दांत गौरव वल्लभ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी एक, दोन नाहीतर तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मे 2023 पासून म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, लोक 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलू शकतील किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करु शकतील.


हेही वाचा – भाजपाला कोण पराभूत करू शकतो या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा – नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -