घरदेश-विदेशडेव्हीड हेडलीची प्रकृती गंभीर

डेव्हीड हेडलीची प्रकृती गंभीर

Subscribe

मुंबईवरील २६/११ हल्ल्यावरील आरोपी हेव्हीड हेडलीवर शिकागोमधील जेलमध्ये हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्याची प्रकृती गंभीर झाली आहे.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतील तुरूंगामध्ये दोन कैद्यांनी हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली असून त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र यावर अमेरिकेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणी डेव्हिड हेडली हा माफीचा साक्षीदार असून सध्या शिकागोच्या तुरूंगामध्ये शिक्षा भोगत आहे. ८ जुलै रोजी डेव्हिड हेडलीवर २ कैद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हेडली गंभीर जखमी झाला आहे. डेव्हीड हेडली हा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी एजंट म्हणून काम करत होता. १९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर भारतातील प्रमुख मंदिरांवर हल्ला करण्याचा डाव पाकिस्तानमध्ये शिजला. गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यामध्ये हेडलिचा सहभाग देखील होता. अटकेनंतर हेडलिने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. डेव्हिडवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पीटीआयने शिकागो जेल प्रशासनाला मेल केला होता. त्यावर आम्ही याबद्दल काहीही उत्तर देऊ शकत नाही असे शिकागो जेल प्रशासनाने सांगितले. मारहाणीमध्ये हेव्हिडला गंभीर दुखापत झाली आहे.

२६/११ मध्ये हेडलीचा सहभाग असा होता

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. समुद्रमार्गाने मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर दहशतवाद्यांनी कामा रूग्णालय, सीएसएमटी रेल्वे स्थान, ताज, गोरेगाव चौपाटी येथे हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये १६० जण ठार झाले होते. तर काही पोलीस अधिकारी देखील शहीद झाले होते. हल्ल्यापूर्वी मुंबईची रेखी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका हेडलीने बजावली होती. डेव्हिड कोलमान हेडली हा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. २००६ ते २००८ या काळात डेव्हिडने भारताला ५ वेळा भेट दिली होती. यावेळी त्याने ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि नरीमन पॉईंटसह मुंबईतील प्रमुख ठिकाणांची रेखी केली होते. शिवाय फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. डेव्हिड हेडलीने केलेल्या रेखीच्या आधारावर १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये १६० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडण्यात आला होता. त्यानंतर कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. २००९ साली डेव्हिड हेडलीला मुंबईवरील २६/११ हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. यावरील सुनावणी दरम्यान हेडली हा लष्कर – ए – तैयबाचा दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -