घरताज्या घडामोडी...यामुळे येत्या वर्षात भारतीय आयटी कंपन्यांमधील ३० लाख नोकऱ्या धोक्यात

…यामुळे येत्या वर्षात भारतीय आयटी कंपन्यांमधील ३० लाख नोकऱ्या धोक्यात

Subscribe

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. पण आता हळूहळू अनेक रोजगार उपलब्ध होत आहेत. परंतु आता ऑटोमेशेनमुळे भारतीय आयटी कंपन्यांमधील ३० लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील कंपन्या ज्या वेगाने ऑटोमेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्या २०२० पर्यंत जवळपास ३० लाख नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. असे केल्याने कंपन्यांची १०० अब्ज डॉलर्स म्हणजे ७.३ लाख कोटी रुपयांची बचत होईल.

नासकॉमने आपल्या अहवालात सांगितले आहे की, ‘देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास १.६ कोटी नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये ९० लाख कर्मचारी बीपीओ आणि अन्य कमी स्तरावर काम करतात. यापैकी ३० टक्के म्हणजेच ३० लाख नोकऱ्या पुढील वर्षातपर्यंत जाऊन शकतात. फक्त एकट्या रोबोट प्रोसेस ऑटोमेशनमुळे ७ लाख रोजगारांचा बळी जाणार आहे.

- Advertisement -

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि कॉग्जिजेंटसारख्या कंपन्या येणार वर्षात ऑटोमेशनमुळे नोकऱ्यात घट करू शकतात. यामुळे १०० अब्ज डॉलरची बचत होईल, परंतु ऑटोमेशनसाठी १० अब्ज डॉलर खर्च होईल. शिवाय ५ अब्ज डॉलर नवीन नोकऱ्याच्या वेतनात खर्च होईल.

दुसऱ्या लाटेत तरुणांनी गमावली नोकरी

फॉर्च्यून-५०० रिपोर्टनुसार, महामारीच्या दुसऱ्या लाटेत तरुण आणि जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक नोकरी गमावली. २४ वर्षांच्या वयोगटातील तरुणांपैकी ११ टक्के जणांच्या नोकऱ्या गेला. गेल्यावर्षी १० टक्के सरासरी होती. त्याचप्रमाणे ५० वर्षांपेक्षा जास्त रोजगार असणारे ५ टक्के लोक बेरोजगार झाले आहेत. मागच्या वर्षी हा टक्का ४ होता.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -