घरदेश-विदेशनिष्काळजीपणामुळे २०२० मध्ये रस्ते अपघातांमध्ये १.२० लाख मृत्यू, रोज ३२८ लोकांचा मृत्यू

निष्काळजीपणामुळे २०२० मध्ये रस्ते अपघातांमध्ये १.२० लाख मृत्यू, रोज ३२८ लोकांचा मृत्यू

Subscribe

निष्काळजीपणामुळे भारतात २०२० मध्ये १.२० लाख लोकांनी रस्ते अपघातामुळे आपले प्राण गमावल्याचे समोर आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असूनही दररोज सरासरी ३२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०२० वार्षिक ‘क्राईम इंडिया’ अहवालातून असे समोर आले आहे की, तीन वर्षांच्या कालावधीत निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात ३.९२ लाख लोकांचा जीव गेला आहे. तर २०२० मध्ये १.२० लाख मृत्यूंची नोंद झाली आहे, तर २०१९ मध्ये हा आकडा १.३६ लाख आणि २०१८ मध्ये १.३५ लाख होता.

एनसीआरबीच्या अहवालातून असे स्पष्ट झाले की, २०१८ पासून देशात ‘हिट अँड रन’ची १.३५ लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत. केवळ २०२० मध्ये ४१ हजार १९६ हिट अँड रन प्रकरणांची नोंद करण्यात आली होती, तर २०१९ मध्ये ४७ हजार ५०४ आणि २०१८ मध्ये ४७ हजार २८ होती. गेल्या वर्षभरात देशभरात दररोज सरासरी ११२ हिट अँड रनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

- Advertisement -

एनसीआरबीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की २०२० मध्ये निष्काळजीपणामुळे १३३ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. २०१९ च्या तुलनेत २०१ आणि २०१८ मध्ये २१८ असे मृत्यू झाले होते. अहवालानुसार, २०२० मध्ये ‘नागरी संस्थांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू’ झाल्याची ५१ प्रकरणे नोंदवली गेली, तर २०१९ मध्ये १४७ आणि २०१८ मध्ये ४० या अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये देशभरात ‘इतर निष्काळजीपणाच्या मृत्यूंची’ ६ हजार ३६७ प्रकरणे नोंदवली गेली, जी २०१९ मध्ये ७ हजार ९१२ आणि २०१८ मध्ये ८ हजार ६८७ होती.


मुंबईत लालबागच्या राजासह १० दिवसांच्या बाप्पांना निरोप; सायंकाळी ६ पर्यंत ३,९६० गणेशमूर्तींचे विसर्जन

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -