घरताज्या घडामोडीGalwan खोऱ्यात झालेल्या चकमकीत 38 चिनी सैनिक बुडाले नदीत ; 'या' रिपोर्टमध्ये...

Galwan खोऱ्यात झालेल्या चकमकीत 38 चिनी सैनिक बुडाले नदीत ; ‘या’ रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Subscribe

गलवान खोऱ्यात झालेल्या चिन आणि भारतीय सैनिकांमध्ये 2020 मधील चकमकीबाबत एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने मोठा खुलासा केला आहे. या खुलास्यातून चीनचा खुलासा झाला आहे. या गलवान खोऱ्यातील चकमकीमध्ये चीनने केलेल्या दाव्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे या अहवालात समोर आले आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या चिन आणि भारतीय सैनिकांमध्ये 2020 मधील चकमकीबाबत एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने मोठा खुलासा केला आहे. या खुलास्यातून चीनचा खुलासा झाला आहे. या गलवान खोऱ्यातील चकमकीमध्ये चीनने केलेल्या दाव्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे या अहवालात समोर आले आहे. खोऱ्यातील गलवान नदी ओलांडताना अनेक चिनी सैनिक नदीतच बुडाले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असून, चीनचे मोठे नुकसान झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द क्लॅक्सन’ने चीनमधील अज्ञात संशोधक आणि ब्लॉगर्सचा हवाला दिला आहे.

गलवानमधील चकमकीत अधिकृत संख्येपेक्षा कितीतरी पट जास्त चिनी सैनिक मारले गेले. नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) गलवान खोऱ्यातील युद्धात किमान नऊ पट अधिक सैनिक गमावले. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द क्लॅक्सन’मधील एका लेखानुसार, अंधारात वेगाने वाहणारी नदी पार करताना किमान 38 चिनी सैनिक बुडाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गलवान व्हॅली संघर्षात भारतासोबत झालेल्या संघर्षात अनेक चिनी सैनिक ठार झाल्याचा खुलासा झाल्यानंतर चीनचा खोटेपणा उघड झाला आहे. सोशल मीडिया संशोधकांच्या एका गटाने वर्षभराच्या तपासानंतर हा अहवाल दिला आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे की चीनने पुष्टी केलेल्या चार सैनिकांपैकी फक्त एक ज्युनियर सार्जंट वांग झुओरान बुडाल्याची नोंद आहे. अहवालात असे म्हटले आहे की त्या रात्री वांगसोबत पीएलएचे किमान 38 सैनिक बुडाले.

गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली

जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले 20 सैनिक मारले गेल्याचे भारताने म्हटले होते. 15 जून आणि 16 जून 2020 च्या मध्यरात्री समोरासमोर झालेल्या मारामारीत जीवितहानी झाली. गलवान खोऱ्यातील संघर्ष हा भारत आणि चीन यांच्यातील चार दशकांतील सर्वात प्राणघातक संघर्ष होता.

- Advertisement -

हे ही वाचा – केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित IGCSE व IB च्या शाळा उभारणार, 15 कोटींची तरतूद


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -