घरताज्या घडामोडीस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई, 4 दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई, 4 दहशतवाद्यांना अटक

Subscribe

स्वातंत्र्य दिनी मोटारसायकल आयईडी स्फोट घडवून आणण्याचा मोठा कट या दहशतवाद्यांचा होता.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनी मोटारसायकल आयईडी स्फोट घडवून आणण्याचा मोठा कट या दहशतवाद्यांचा होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे सत्यात उतरू शकले नाहीत.

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या चार दहशतवाद्यांना आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. हे दहशतवादी ड्रोनद्वारे टाकण्यात आलेली शस्त्रास्त्र गोळा करून घाटीमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना पोहोचवण्याचा कट आखत होते. इतकेच नाही तर हे दहशतवादी स्वातंत्र्य दिनी वाहनात आयईडी लावून मोठा स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्यासह देशातील अन्य शहरातील टार्गेटची रेकीही हे दहशतवादी करत होते.

- Advertisement -

पोलिसांनी सुरुवातीला मुंतजिर मंजूर या दहशतवाद्याला अटक केलीय. मुंतजिर हा पुलवामाचा राहणारा आणि जैशचा दहशतवादी आहे. मुंतजिरकडून पोलिसांनी एक पिस्तूल, एक मॅक्झीन, 8 राऊंड काडतूस आणि दोन चीनी हॅन्डग्रेनेड जप्त केलेत. तो एका ट्रकच्या सहाय्याने शस्त्रास्त्र पुरवण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी तो ट्रकही जप्त केला आहे.

मुंतजिरसह पोलिसांनी अजून तीन दहशतवाद्यांना अटक केलीय. यात इजाहर खान उर्फ सोनू खानचा समावेश आहे. सोनू हा उत्तर प्रदेशातील शामलीच्या कंडाला इथला रहिवासी आहे. सोनूने सांगितलं की त्याला पाकिस्तानच्या जैश कमांडर मनाजिर खान याने अमृतसरहून शस्त्रास्त्र गोळा करण्यास सांगितलं होते. जे ड्रोनच्या माध्यमातून खाली टाकण्यात आले होते. इतकंच नाही तर त्याच्याकडून पानीपत ऑईल रिफायनरीची रेकी करण्यासही सांगण्यात आले होते. या दहशतवाद्याने रिफायनरीचा एक व्हिडिओ बनवून पाकिस्तानला पाठवला होता. त्यानंतर त्याला अयोध्येतील राम जन्मभूमीची रेकी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, त्याला तिथे अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूस ते स्वत: जबाबदार; तालिबान्यांचे स्पष्टीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -