घरअर्थजगतजर ५० हजार पगार असेल, तर PF व्याजदरात घट झाल्यामुळे इतके होईल...

जर ५० हजार पगार असेल, तर PF व्याजदरात घट झाल्यामुळे इतके होईल नुकसान

Subscribe

कर्मचाऱ्यांच्या भविष्याची हमी मानल्या जाणाऱ्या पीएफ ठेव (PF Deposit)वर ईपीएफओने (EPFO) व्याजदरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात जर कोणत्या कर्मचाऱ्याचा पगार ५० हजार रुपये महिना असेल तर वर्षभरात त्याच्या पीएफ डिपॉजिटवर मिळणाऱ्या व्याजातील रक्कमेत आता किती नुकसान होणार हे जाणून घ्या. सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्या की, ईपीएफओने व्याजदरात ८.५ टक्क्यांनी घट करून ८.१ टक्के केला आहे.

पीएफ किती होतो जमा?

एका कर्मचाऱ्याचा पगाराचा १२ टक्के भाग त्याचा पीएफ खात्यात जमा केला जातो. या हिशोबाने जर एखाद्याचा पगार ५० हजार रुपये महिना असेल तर त्याच्या पीएफ खात्यामध्ये ६ हजार रुपये दर महिना जमा होतो.

- Advertisement -

पीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नियोक्त्याला (एम्प्लॉयर) देखील केवळ १२% योगदान द्यावे लागते. परंतु यामधील ८.३३ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पेन्शन फंडमध्ये (EPS Fund) जाते आणि उर्वरित ३.६७ टक्के रक्कम पीएफ खात्यात जातो. या हिशोबाने जर कोणत्या कर्मचाऱ्याचा पगार ५० हजार रुपये आहे, तर त्याच्या नियोक्त्याच्या पीएफ खात्यामध्ये १ हजार ८३५ रुपये जमा करेल. उर्वरित ४ हजार १६५ रुपये त्याच्या पेन्शन खात्यामध्ये जमा केले पाहिजे. परंतु कोणत्याही नियोक्ताच्या पेन्शन खात्यांमध्ये जास्तीत जास्त १ हजार २५० रुपये महिना जमा केले जातात. या हिशोबाने उर्वरित २ हजार ९१५ रुपयांची रक्कम कर्मचाऱ्याच्या पीएफ फंडमध्ये जाईल. यावर नियोक्त्याकडून त्याच्या पीएफ खात्यामध्ये दर महिना ४ हजार ७५० रुपये जमा केले जातील.

वर्षभरात जमा करावा लागले इतका पीएफ

जर तुमचा ५० हजार रुपये महिना पगार असेल तर तुम्हाला आणि तुमच्या नियोक्ताचे कॉट्रिब्यूशन मिळून दर महिना तुमच्या पीएफ खात्यामध्ये १० हजार ७५० रुपये जमा होतील. अशा प्रकारे वर्षाला तुमच्या पीएफ खात्यामध्ये एकूण १.२९ लाख रुपये जमा होईल.

- Advertisement -

५० हजार पगाराप्रमाणे गेले आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पीएफवर मिळणारा ८.५ टक्के व्याज दराच्या हिशोबाने एकूण पीएफ जमा (१.२९ लाख रुपये)वर १० हजार ९६५ रुपये व्याज उत्पन्न (Income From Interest) असतो. आता ईपीएफओने २०२१-२२ साठी या व्याजदरात घट करून ८.१ टक्के केला आहे. अशाप्रकारे आता व्याजातील उत्पन्न १० हजार ४४९ रुपये असेल. त्यामुळे आता वर्षातील व्याज उत्पन्नात ५१६ रुपये घट होईल.


हेही वाचा – होळीचा रंग रशिया-युक्रेन युद्धानं फिका; Refined Oil सह खाद्य तेलांचे दर वाढले


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -